Corona Update | राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 500 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णसंख्या 30706 वर
राज्यात आज 1606 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30,706 झाली आहे. तर आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706 झाली आहे. आज 1606 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 22 हजार 479 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 61 हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 34 हजार 557 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात 67 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 41, पुण्यात 7, ठाणे शहरात 7, औरंगाबाद शहरात 5, जळगावमध्ये 3, मीरा-भाईंदरमध्ये 2, नाशिक शहरात 1 तर सोलापूर शहरामध्ये 1 मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 47 पुरुष तर 20 महिला आहेत. आज झालेल्या 67 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 38 रुग्ण आहेत तर 25 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 67 रुग्णांपैकी 44 जणांमध्ये (66 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
संबंधित बातम्या
- संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
- झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं; चौथ्या लॉकडाऊनआधी राज्याची केंद्राकडे मागणी
- कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना
Nirmala Sitharaman | संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के -अर्थमंत्री निर्मला सीतारमण



















