एक्स्प्लोर

बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज झाले दीडशे वर्षांचे

नेटिव्ह शेअर अॅँड स्टॅाक ब्रोकर्स असोसिएशन म्हणून स्थापन झालेल्या बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज भारतातील पहिले, तर आशिया खंडातील सर्वात जुने स्टॅाक एक्सचेंज म्हणून ओळखले जाते. याचा क्रमांक जगातील 10 वा सर्वात जुने स्टॅाक एक्सचेंज म्हणूनही लागतो. आज बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज 150 वे वर्ष साजरे करत आहे. याची स्थापना 9 जुलै 1875 रोजी उद्योगपती प्रेमचंद रॅायचंद यांच्याद्वारे करण्यात आली, जे त्या काळी कॅाटन किंग म्हणून ओळखले जात होते.

भारताच्या भांडवली बाजाराच्या विकासात बीएसईचे सर्वोच्च योगदान आहे. हे अधिकृतपणे स्थापना होण्याआधी, 20 वर्षांपासून बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज मुंबई येथील टाऊन हॅाल समोर चालत असे. नंतर बीएसईचे मुख्यालय फिरोज जीजीभॉय टॉवर्सचे बांधकाम 1973 मध्ये सुरु झाले. जे दलाल सेंट, फोर्ट येथे स्थित आहे.

 केवळ 318 सदस्यांपासून सुरुवात झालेल्या या स्टॅाक एक्सचेंजसाठीचा प्रवेश शुल्क सुरुवातीला फक्त एक रुपया होता. मुंबई, गुजरात आणि मद्रास सारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांच्या जवळ असल्याने, एक्सचेंजचा विस्तार झपाट्याने झाला. आज बॅाम्बे स्टॅाक एक्सेंजमधील कंपनीची संख्या 5671 असून एकूण बाजार भांडवल 461 लाख कोटी आहे.

निर्देशांकाद्वारे एक्सचेंजचे मोजमाप केले जाते, हे लक्षात घेता 1986 मध्ये बीएसई सेन्सिटिव्ह इंडेक्सची  सुरूवात केली गेली. जो "मार्केट कॅपिटलायझेशन-वेटेड" इंडेक्स या नावाने जानेवारी 1986 मध्ये समोर आला. हा भारतातील पहिला इक्विटी इंडेक्स होता. त्यानंतर 1994 मध्ये नॅशनला स्टॅाक एक्सचेंज कार्यरत झाले. ज्यामुळे, डिजिटल ट्रेडिंग सुरु झाले आणि गुंतवणूकदारांना स्टॅाकच्या किंमती चालू वेळी उपलब्ध होऊ लागल्या. 

बीएसईमध्ये आर्थिक व्यवहार  इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीमद्वारे ऑनलाइन केले जातात. बॅाम्बे स्टॅाक एक्सेंजइक्विटी, चलने, कर्ज साधने, डेरिव्हेटिव्हज तसेच म्युच्युअल फंड अशा गोष्टींच्या व्यापारासाठी बाजारपेठ खुली करते.बीएसईचा  सेन्सेक्स भारतातील ३० सर्वात मोठ्या आणि सर्वात चांगल्या भांडवलाच्या स्टॉकचे प्रतिनिधित्व करतो जो देशातील सर्वाधिक पाहिलेला निर्देशांक आहे.

1907 मध्ये स्वदेशी चळवळ आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा आयपीओ हे बीएसईसाठी महत्त्वाचे टप्पे ठरले. 1995 मध्ये, बीएसईने स्क्रीन-आधारित ट्रेडिंग सिस्टम सुरू केली आणि तिला बॉम्बे ऑनलाइन ट्रेडिंग सिस्टम म्हणजेच बोल्ट असे नाव देण्यात आले. नंतर बीएसईने सप्टेंबर 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत स्टॅाक एक्सचेंज उपक्रमात भागीदार एक्सेंज म्हणून पाऊल ठेवले. 

बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज हा देशाचा प्रमुख स्टॅाक एक्सचेंज म्हणून, बीएसई भारताच्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ राहील, जो भरभराटीसाठीही एक प्लॅटफॅार्म म्हणून काम करेल.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल, अभिजीत दीपके यांचा सरकारला इशारा
सरकारनं 'तो' प्रयत्न करु नये, मनोज जरांगेना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल : अभिजीत दीपके
Manoj Jarange: जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार, म्हणाले, काड्या कशाला लावतो; घाणेरडी भाषा अन् जिल्हाधिकाऱ्यांवरही बोलले
जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार, म्हणाले, काड्या कशाला लावतो; घाणेरडी भाषा अन् जिल्हाधिकाऱ्यांवरही बोलले
Crime News: आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला,
आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला, "मला पश्चात्ताप नाही, मी बाहेर गेल्यावर तिच्या 'शुगर डॅडी'लाही..."
Aaditya Thackeray : MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल, आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल, आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल, अभिजीत दीपके यांचा सरकारला इशारा
सरकारनं 'तो' प्रयत्न करु नये, मनोज जरांगेना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल : अभिजीत दीपके
Manoj Jarange: जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार, म्हणाले, काड्या कशाला लावतो; घाणेरडी भाषा अन् जिल्हाधिकाऱ्यांवरही बोलले
जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पलटवार, म्हणाले, काड्या कशाला लावतो; घाणेरडी भाषा अन् जिल्हाधिकाऱ्यांवरही बोलले
Crime News: आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला,
आधी पत्नीला संपवलं, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं; बोटंही छाटली, पोलिसांना खुलासा करताना म्हणाला, "मला पश्चात्ताप नाही, मी बाहेर गेल्यावर तिच्या 'शुगर डॅडी'लाही..."
Aaditya Thackeray : MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल, आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल, आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
Accident News: महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
Manoj Jarange: टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
FDA Action In Pune  : खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
Top 10 Billionaires: जगातील अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर  
अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर   
Embed widget