एक्स्प्लोर

Donald Trump : यूरोपियन यूनियन आणि मेक्सिकोवर टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लेटर जारी

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलनंतर आता यूरोपियन यूनियन आणि मेक्सिकोवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि यूरोपियन यूनियनवर  30 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. मेक्सिको आणि यूरोपियन यूनियनवरील टॅरिफ 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर टॅरिफ लादताना एक लेटर पाठवलं आहे. मेक्सिकोतून अमेरिकेत ड्रग्जची तस्करी होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. यूरोपियन यूनियनमुळं व्यापारात असंतुलन निर्माण होत असल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी  सहा व्यापारी भागीदार देशांवर टॅरिफ लादलंहोतं त्यामध्ये  लीबिया, अल्जीरिया, इराक, मोल्दोवा, फ्लीपीन्स आणि ब्रुनोईचा समावेश होता. 

डोनाल्ड ट्र्म्प यांनी आतापर्यंत 20 हून अधिक देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. यामध्ये म्यानमार, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि जपानचा देखील समावेश होता. विशेष बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये अमेरिकेच्या मित्र देशांना देखील सोडलेलं नाही. भारतासंदर्भात अद्याप ट्रम्प यांनी निर्णय जाहीर केलेला नाही. अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरु आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाल्यास भारतावरील टॅरिफ 20 टक्क्यांपेक्षा कमी असेल अशी शक्यता आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अल्जिरिया, इराक आणि लाबियावर 30 टक्के टॅरिफ लादलं आहे. तर, ब्रुनेई आणि मोल्दोवावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. फिलीपाईन्सवर 20 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी कझाकिस्तान, कंबोडिया, बोस्निया, दक्षिण आफ्रिका, थायलँड, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया आणि ब्राझीलवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेनं टॅरिफशिवाय 10  टक्के बेसिक ड्यूटी लागू असेल असं देखील सांगितलं आहे.  

कोणत्या देशावर किती टॅरिफ?

अमेरिकेनं ब्राझीलवर सर्वाधिक 50 टक्क्यांपेक्षा अधिक टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर म्यानमार आणि लाओसवर 40-40 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. कंबोडिया आणि थायलंड 36 टक्के, बांगलादेश आणि सर्बियावर 35 टक्के,इंडोनेशियावर 32 टक्के, बोस्निया आणि हर्जेगोविनावर 30 टक्के, दक्षिण आफ्रिकेवर 30 टक्के, जपान, कझाकिस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि ट्यूनिशियावर  25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. 

दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी करारा संदर्भात चर्चा सुरु आहेत. भारताकडून शिष्टमंडळ अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे. अमेरिकेला भारतातील कृषी, डेअरी क्षेत्र खुलं करण्याची अपेक्षा आहे. भारतानं कृषी आणि डेअरीमधील उत्पादनांवर लादलेलं आयात शुल्क कमी करावं, अशी अमेरिकेची भूमिका आहे. भारत मात्र त्याला तयार नाही.   

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण सुरूच, प्रति 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सोने-चांदीचा ताजा भाव
सोन्याच्या दरात घसरण सुरूच, प्रति 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सोने-चांदीचा ताजा भाव
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
EPFO :  आता पीएफ खात्यातील 1800 रुपयांवरील योगदान ऐच्छिक, ईपीएफओचा मोठा निर्णय, जाणून कोणाला फायदा होणार?
EPFO :  आता पीएफ खात्यातील 1800 रुपयांवरील योगदान ऐच्छिक, ईपीएफओचा मोठा निर्णय
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
Embed widget