एक्स्प्लोर
Pune Crime news: पुण्यातील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांची धाड, थायलंडच्या 10 मुलींची सुटका
Pune Crime News: पुण्यातील प्रसिद्ध स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, 10 परदेशी मुली ताब्यात, वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघड. या घटनेमुळे विमानतळ आणि बाणेर भागात खळबळ उडाली आहे.
Pune crime news
1/7

पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी कारवाई करत 18 मुलींची सुटका केली आहे.
2/7

पुण्यातील उच्चभ्रू बाणेर आणि विमानतळ भागात पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये 18 मुलींपैकी 10 पेक्षा अधिक मुली परदेशी नागरिक असल्याचं समोर आलं आहे.
3/7

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
4/7

विमानतळ परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून एकूण 16 मुलींची सुटका करण्यात आली आहे. या 16 मुलींपैकी 10 परदेशी आणि 2 भारतीय आहेत.
5/7

या स्पा सेंटरच्या जागा मालकासह, स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या कारवाईत, उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या बाणेरमध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई करत एका स्पा सेंटरवर छापा टाकला.
6/7

या प्रकरणात किरण ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय 28, रा. खराडी) या महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्यावर पीटा कायदा, पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 15 आणि 17 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.
7/7

आरोपी किरण आडे ही ‘स्पा’ सेंटरची मालक आणि व्यवस्थापक होती. पोलिस तपासात उघड झाले आहे की, तिने तीन तरुणींसह गरिब कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींना मसाज सेंटरमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. नंतर अधिक मोबदल्याचे प्रलोभन देत त्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले. मुलींना मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचा गैरफायदा घेत, त्यांच्यावर दबाव टाकून हा व्यवसाय चालवला जात होता.
Published at : 09 Jul 2025 01:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















