एक्स्प्लोर
12 Historic Forts Added to UNESCOयुनेस्को यादीत महाराष्ट्राचे 12 किल्ले,जतन संवर्धनाची मोठी जबाबदारी
“Maratha Military Landscapes” या नावाने 12 मराठा किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांच्या लष्करी स्थापत्याला जागतिक पातळीवर खऱ्या अर्थाने स्थान मिळाले आहे. या किल्ल्यांना 'वर्ल्ड रिकॉग्नायशन' मिळाल्याने त्यांचे योग्य पद्धतीने जतन आणि संवर्धन करणे ही आता मोठी जबाबदारी आहे. या किल्ल्यांवरील झालेली अतिक्रमणं तातडीने काढली पाहिजेत. तसेच, पुरातत्त्वीय शास्त्राच्या निकषांवर या किल्ल्यांचे जतन संवर्धन होणे आवश्यक आहे. UNESCO च्या यादीत आल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडून या किल्ल्यांची डागडुजी सर्वोत्तम व्हावी अशी अपेक्षा आहे. जेव्हा जागतिक पर्यटक या किल्ल्यांवर येतील, तेव्हा त्यांना शिवछत्रपतींच्या तत्कालीन स्थापत्यकला, इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरचे महत्त्व कळावे. पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हे, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेळी आणि तामिळनाडूतील जिंज या किल्ल्यांचा या यादीत समावेश आहे. "हे दुर्ग, हे लष्करी स्थापत्य, ज्याला वर्ल्ड रिकॉग्नायशन मिळालंय ते योग्य पद्धतीनं जतन संवर्धन झालं पाहिजे," असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















