Jayant Patil : जयंत पाटलांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा, शशिकांत शिंद स्वीकारणार पदभार
Jayant Patil : जयंत पाटलांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा, शशिकांत शिंद स्वीकारणार पदभार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात मोठी नेतृत्व बदलाची घडामोड समोर आली आहे. जयंत पाटील यांनी अखेर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी शशिकांत शिंदे येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. शशिकांत शिंदे 15 जुलै रोजी अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांनी पक्ष नेतृत्वासमोर आपल्या पदमुक्तीची विनंती केली होती. 10 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी, सार्वजनिकरित्या त्यांनी ही मागणी करत म्हटलं होतं की, "मला पवार साहेबांनी सात वर्षे संधी दिली. आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, त्यानंतर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षफुटीच्या आधी प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांना हवं असल्याची चर्चा होती, मात्र त्यांना ते मिळालं नाही, त्यानंतर पक्षाचे दोन भाग झाले, त्यानंतर आताच्या या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलावरती अजित पवारांना बारामतीत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलणं टाळलं असल्याचं दिसून आलं.
महत्त्वाच्या बातम्या























