एक्स्प्लोर

WHO | कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना

कोरोना विषाणू इतर विषाणूप्रमाणे कधीचं नष्ट न होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समस्यांचे संचालक मायकेल रायन यांनी व्यक्त केली आहे. जिनिव्हा येथे झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला.

जिनिव्हा : कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या महामारी संदर्भात एक इशारा दिला आहे. कोरोना विषाणू आपल्यातून कधीही नष्ट होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समस्यांचे संचालक मायकेल रायन यांनी जिनिव्हा येथे घेतलेल्या एका ऑनलाई पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला. इतर विषाणूप्रमाणे कोरोना हा विषाणू कायमस्वरुपी नष्ट होणार नसल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

मायकेल रायन यांनी यावेळी एचआयव्ही विषाणूचे उदाहरण दिले. हा विषाणू अद्याप नष्ट झाला नाही. मायकेल रायन यांच्या म्हणण्यानुसार लस नसल्यास सामान्य लोकांना या आजाराविरोधात रोग प्रतिकारशक्ती विकसित होण्यास अनेक वर्ष लागू शकतात. कोविड 19 वर जगभरात जवळपास 100 लस तयार करण्याचे प्रयोग सुरू आहेत. मात्र, ही लस कधी विकसित होईल, हे कुणीही सांगू शकत नसल्याची भीती जगभरातील शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर, 16.50 लाखांहून अधिक रुग्ण बरे

जगभरातील देशांनी आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरण्यास मदत होईल, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहनॉम जिब्रायस यांनी व्यक्त केले आहे. जिब्रायस म्हणाले, "सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बरेच देश वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. परंतु, जागतिक आरोग्य संघटना जगातील सर्व देशांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहे. प्रत्येक देशाने सावध राहणे फार आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 44 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या दोन लाख 97 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 88,202 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5314 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 97 हजार 765 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाख 57 हजार 716 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.

Coronavirus | WHO च्या सूचनेनुसार भारतात चार औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Embed widget