एक्स्प्लोर

आबांचं दुर्लक्ष, पण पवारांमुळे सनातनवर बंदीची शिफारस : श्याम मानव

मूळ पत्र पवारांच्या नावाने असल्यामुळे ते लीक करत नाही. कारण शरद पवारसारख्या माणसाने पुढे केलं काय, असा प्रश्न निर्माण होईल अशीही भूमिका त्यांनी मांडली.

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष दिले म्हणून एटीएसने सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी शिफारस केली, अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिली. ते चंद्रपुरात श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलत होते. “सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समिती विरोधकांना संपविण्यासाठी काय करु शकतात, याची माहिती आपण 2008 मध्ये आर. आर. पाटलांना दिली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आपण शरद पवारांना याची माहिती दिली. त्यानंतर ATS ने फाईल तयार करुन या संस्थांवर बंदी घालण्याची शिफारस केली.” अशी माहिती श्याम मानव यांनी दिली. “2008 मध्ये शरद पवारांना आपण पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये सनातन आणि हिंदू जनजागरण समिती हे लोक विरोधकांना विष देऊन मारतील, एड्सचे इंजेक्शन देऊन मारतील, बंदुकीने मारतील अशी पूर्ण यादी दिली होती. याआधी हीच माहिती तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही दिली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शरद पवारांनी लक्ष दिल्यावर ATS ने फाईल तयार केली आणि बंदी ची शिफारस केली. तेव्हा पासून ATS चे अधिकारी सनातन-हिंदू जनजागरणच्या सदस्यांकडे चहा पीत नाही.” अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मूळ पत्र पवारांच्या नावाने असल्यामुळे ते लीक करत नाही. कारण शरद पवारसारख्या माणसाने पुढे केलं काय, असा प्रश्न निर्माण होईल अशीही भूमिका त्यांनी मांडली. “आघाडी सरकारच्या काळात संमत झालेला ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा, जादूटोणाविरोधी कायदा व अंमलबजावणी’ यांचे जनजागृती कार्य त्याच काळात वेगाने झाले. मात्र देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून यातील एकही पैसा मिळाला नसून जनजागृती आणि पोलिसांच्या प्रशिक्षणाचे काम ठप्प झाले आहे.” अशी खंतही श्याम मानव यांनी व्यक्त केली. श्याम मानव हे राज्य सरकारच्या 'जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार कार्यक्रम अंमलबाजवणी समिती'चे सहअध्यक्ष आहेत. “अजित पवारांमुळे यंत्रणा लगबग करायची, आता तसे होत नाही. “आधीच्या सरकारमध्ये भेटीगाठीदरम्यान अजित पवार या कायद्यासाठी सरकारी सचिवांना फोन करायचे, तेव्हा यंत्रणा लगबग करायची. मात्र आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या सचिवांना फोन केला तरी सचिव भेटीची वेळ देत नाही.” अशी टीकाही श्याम मानव यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sangli Palika : सांगलीकरांवर करांचा बोजा, सांगली महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Nashik Palika : नाशिकमध्ये पाण्याची टंचाई, नागरिकांचे हाल, महापालिकेचे महामुद्दे काय?Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget