Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा
Maharashtra Monsoon : हळूहळू मान्सून राज्यात पुढे सरकत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.
LIVE

Background
Mumbai Rain Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात
Mumbai : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
Aurangabad Rain Update: औरंगाबादमधील काही भागात पावसाची हजेरी
Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात आज पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील गंगापूर आणि कन्नड तालुक्यातील चापानेर येथे पावसाने हजेरी लावली. मात्र अजूनही अनेक भागात बळीराजाचे लक्ष पावसाकडे लागले आहेत.

पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी, जव्हार शहरात धुक्याची चादर
पालघर जिल्ह्यात पावसानं सलग दोन दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर आज जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जव्हार शहरात मनमोहक धुक्याची चादर पाहायला मिळाली. पहाटेपासूनच संपूर्ण जव्हार शहराला आल्हाददायक धुक्यानं वेढा घातल्याचे चित्र आहे.
तळकोकणात संततधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच कोकणाला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज