एक्स्प्लोर

भारतात टेलिग्राम बॅन? एजन्सीची करडी नजर, केव्हाही होऊ शकते मोठी कारवाई

Telegram May Banned In India: पेपरफुटीप्रकरणी सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे, कारण विरोधकांनी पेपरफुटीचा मुद्दा बनवून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

Will Telegram Banned In India: नवी दिल्ली : टेलिग्राम म्हणजे, भारतातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. टेलिग्रामचा युजरबेस फार मोठा आहे. मात्र, आता टेलिग्राम ॲपवर भारतातून बंदी येऊ शकते. दरम्यान, टेलिग्राम ॲपवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पेपर लीकमध्येही टेलिग्राम अॅपचं नाव समोर आलं आहे. टेलिग्रामवर खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, पेपरफुटीप्रकरणी सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे, कारण विरोधकांनी पेपरफुटीचा मुद्दा बनवून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. अशा परिस्थितीत पेपरफुटी प्रकरण आणि टेलिग्रामचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं टेलिग्रामची चौकशी सुरू केली आहे.

टेलिग्रामचे संस्थापक अटकेत 

फ्रांसच्या पॅरिस एयरपोर्टवरुन टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव (CEO Pavel Durov Arrest) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग (Money laundering) आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी टेलिग्रामचा वापर केल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फ्रान्स आणि रशियाचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या 39 वर्षीय ड्युरोव शनिवारी (24 ऑगस्ट) अझरबायजानहून फ्रान्समध्ये उतरल्यानंतर पॅरिस-ले बोर्जेट विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. भारतातही इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस- टेलिग्रामचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आलं आहे. 

टेलिग्राम आणि पेपर लीक प्रकरणाचं कनेक्शन काय? 

Moneycontrol च्या अहवालानुसार, भारत सरकारनं टेलिग्राम ॲपची चौकशी सुरू केली आहे. तपासात आरोप खरे ठरले तर सरकार टेलिग्राम ॲपवर बंदी घालू शकतं. सरकार अनेक प्रकरणांमध्ये टेलिग्रामची चौकशी करत आहे. अलीकडेच UGC-NEET वादात सरकार अडचणीत आलं आहे. या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपर लीकमध्ये टेलिग्रामच्या सहभागाबाबतही सरकारनं चौकशी सुरू केली आहे. टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून नीट परीक्षेचे पेपर 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत विकल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर टेलिग्रामवर दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

जाणून घेऊयात, टेलीग्राम अॅप्लिकेशन आतापर्यंत कोणत्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वापरण्यात आलं आहे, त्याबाबत सविस्तर... 

  • 24 जुलै रोजी, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) नं टेलिग्रामच्या माध्यमातून चालवलेलं स्टॉक प्राईस रिगिंग रॅकेट उघडकीस आणलं होतं.
  • 3 मे रोजी भोपाळमधील दोघांना स्थानिक डॉक्टरांची 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यामध्येही या लोकांनी टेलिग्रामचा वापर केला होता.
  • 19 जून 2023 रोजी होणारी UGC-NET परीक्षा टेलिग्रामवर पेपर लीक झाल्याच्या एका दिवसानंतर रद्द करण्यात आली. या समस्येवर लक्ष वेधताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "आम्ही मूळ UGC-NET प्रश्न टेलिग्रामवरील प्रश्नांशी जुळवून पाहिले आणि ते अगदी तंतोतंत जुळले.
  • 3 मे, 2023 रोजी, अनेक NEET-UG अर्जदारांना परीक्षेच्या एक दिवस आधी वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरच्या काही प्रती मिळाल्या. यानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आयटी मंत्रालयानं एमएचएकडून अहवाल मागवला आहे. 

दरम्यान, टेलिग्रामचे प्रमुख पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक केल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं (आयटी) गृह मंत्रालयाकडून माहिती मागवली आहे. यामध्ये त्यांनी भारतातही ॲपद्वारे कोणतेही उल्लंघन केलं आहे का, असा सवाल केला आहे. आयटी मंत्रालयानं याबाबत कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammad Shami : रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : 1 मिनिटांत Shivaji Park गाजवलं; मनसेच्या Deepotsav त उद्धव ठाकरेंचं भाषण
Raj Thackeray MNS Shivaji Park Deepotsav :Uddhav Thackeray यांच्या च्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन
Thackeray Unity : 'ही सगळी भावंडं एका गाडीत', Raj ठाकरे- Uddhav ठाकरे एकत्रित प्रवास
MNS Shivaji Park Deepotsav : दीपोत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, राजकीय समीकरणं बदलणार?
Nashik Demolition Drive: 'दत्त मंदिर बुलडोझरने पाडले', पुरोहित संघाचा गंभीर आरोप; Nashik मध्ये तणाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammad Shami : रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ola Shakti Electric battery: ओला इलेक्ट्रिकची एक घोषणा अन् शेअरमध्ये जोरदार तेजी, ओला शक्ती लाँच, बॅटरीवर एसी, फ्रीज सुरु राहणार
ओला इलेक्ट्रिकचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ओला शक्तीबाबत कंपनीची मोठी घोषणा, स्टॉकमध्ये तेजी सुरु
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता
Embed widget