एक्स्प्लोर

पुलगाव स्फोट : 1 लेफ्टनंट, 1कर्नल, 14 जवान शहीद

वर्धा/ नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा असलेल्या वर्ध्यातील पुलगावमधील दारुगोळा भांडाराच्या अग्नितांडवात 16 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये ले. कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज कुमार यांच्यासह एक लष्कराचा जवान आणि 13 अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे.   सोमवारी मध्यरात्री याठिकाणी सुरुवातीला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी दारुगोळा भांडारमध्ये पोहोचले. मात्र वेअरहाऊसचं दार उघडताच मोठ्ठा स्फोट झाला. या स्फोटात लेफ्टनंट कर्नल आर.एस पवार आणि कर्नल मनोज के. यांचा मृत्यू झाला.   आगीनंतर स्फोटांची मालिका सुरु झाली. या स्फोट आणि अग्नितांडवात 19 हून अधिक जवान जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे या स्फोटाच्या भीषण आवाजाने 12- 13 जवानांच्या कानाचे पडदे फाटले आहेत. संरक्षणमंत्री जवानांच्या भेटीसाठी रुग्णालयात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेत, पुलगावला धाव घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी जवानांची विचारपूस केली.   दोन गावांचं स्थलांतर या स्फोटामुळे दारुभांडार परिसरातील दोन गाव पूर्णपणे स्थलांतर करण्यात आली आहेत. नागझरी आणि आगरगाव अशी या गावांची नावं आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी गंभीर होती की परिसरातील असलेल्या घरांची छतं कोसळली आहेत. अनेकांच्या कानाचे पडदेही फाटले आहेत. काही घरांच्या भिंतीना भेगा पडल्या असून घरांसाठी लावलेले खांब कोसळल्यामुळे अनेकांनी घर सोडलेली आहेत.  या स्फोटानंतर रात्री घटनास्थळी अग्निशमनच्या दोन गाड्या पोहोचल्या होत्या.  मात्र त्या दोन्ही गाड्यांसहित दोन जिप्सी आणि आणखी दोन छोट्या गाड्या स्फोटात खाक झाल्या आहेत.   28 किमीमध्ये दारुगोळा भांडार   दारुगोळा भांडाराचा हा परिसर तब्बल 28 किमीमध्ये पसरला आहे. या स्फोटामुळे केंद्रीय दारुगोळा भांडाराजवळील दोन गावं नागझरी आणि आगरगाव येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. पुलगाव दारुगोळा केंद्राचा संपूर्ण भाग हा लष्कराच्या अखत्यारित येतो. त्यामुळे येथे स्फोट कशामुळे घडला याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.   रात्री दीडच्या सुमारास स्फोट : खासदार रामदास तडस   रात्री दीडच्या सुमारास आवाज आला, गच्चीवरुन पाहिल्यावर आगीच्या ज्वाला दिसत होत्या. त्याचवेळी पुलगाव आग असल्याचं समजलं. आम्ही गाड्या काढून तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी परिसरातील गावकरी घराबाहेर पडले होते, असं वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितलं.   घातपाताची शक्यता नाकारता येत नाही- निवृत्त कर्नल   पुलगाव दारुगोळा भांडारात नेमकी आग कशामुळे लागली, याबाबतची माहिती चौकशीनंतर समोर येईल, मात्र पठाणकोटप्रमाणे इथेही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका निवृत कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली.   आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्रास्त्र भंडार   पुलगाव दारुगोळा भांडार हे भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या दारुगोळा भांडारापैकी एक आहे. तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं दारुगोळा भंडार आहे.   इथे दारुगोळा बनवण्यासोबतच मोठा शस्त्रसाठाही आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील आहे. पुलगाव दारुगोळा भांडाराचा संपूर्ण परिसरत सुमारे 28 किलोमीटरचा आहे. या परिसरात लष्कराच्या जवानांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही.   इथे शस्त्रास्त्रांचा साठा असल्यामुळे साहजिकच मोठ्या सुरक्षा व्यवस्थेचं कवच असतं. शस्त्रास्त्रांचे अनेक बंकर बनवलेले असतात. प्रत्येक बंकरमध्ये सुमारे 5 ते 6 हजार किलो शस्त्रास्त्रांचा साठा असतो.   मात्र आज जी आग लागली ती नेमकी कोणत्या बंकरला लागली आणि त्या बंकरच्या सुरक्षेसाठी किती जवान होते, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

संबंधित बातम्या

पुलगाव स्फोट : 16 जवान शहीद, अनेकांच्या कानाचे पडदे फाटले

लष्कराच्या पुलगाव दारुगोळा भांडारात स्फोटांची मालिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting : Dhananjay Munde यांचा राजीनामा? फडणवीस-पवारांमध्ये बैठकAnjali Damaniya on Santosh Deshmukh:संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर फोटो,अंजली दमानियांचा कंठ दाटलाZero Hour Nashik Palika : नाशिकमध्ये पाण्याची टंचाई, नागरिकांचे हाल, महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Sangli Palika : सांगलीकरांवर करांचा बोजा, सांगली महापालिकेचे महामुद्दे काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Embed widget