Zero Hour Sangli Palika : सांगलीकरांवर करांचा बोजा, सांगली महापालिकेचे महामुद्दे काय?
सांगली महापालिका क्षेत्रात सध्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न हा चर्चेत आहे. या वाढीव घरपट्टीला नागरिकांकडून विरोध सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या वाढीव घरपट्टी बाबतचा कर अमान्य असल्याच्या हरकती घेतल्या आहेत. महापालिकेकडून सामान्य कर, जलनिस्तारण कर, मोठ्या इमारतीमधल्या निवासी जागांवरील कर, शिक्षण कर, तसच महाराष्ट्र शिक्षण कर आणि उपयोगिता कर याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि रोषही दिसून येतोय. हा कर रद्द करण्याची मागणी होते पण सांगली. भरपूर शेती, सोबतीला मोठं इंडस्ट्रियल हब, दोन दोन एमआयडीसी, इतकी मोठी महापालिका म्हणजे मोठा खर्च आणि तोच खर्च भरून काढण्यासाठी पालिकेन एक पर्याय निवडलाय. सांगली, मिरज आणि कुपवाड हे तीन शहर मिळून बनलेल्या सांगली महापालिकेत अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. अशामध्येच सांगली महापालिकेन घरपट्टी वाढीचा हा निर्णय घेतला आहे. याला आता सर्व स्तरातून विरोध होतोय. आता प्रश्न असा आहे की असा कोणता कर पालिकेने लावलाय ज्यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे? तर ते आधी पहा. महापालिकेकडून सामान्य कर, जलनिस्तारण कर, मोठ्या इमारती आणि निवासी जागेवरील कर, महाराष्ट्र शिक्षण कर आणि उपयोगिता कर लागू केलेत. महाराष्ट्रातली ही एकमेव महानगरपालिका आहे की जिथे 58% भाड्यावर त्यांचा घर लागतो आहे. आमच्या इथं आता घरपट्टी वाढून आलेली आम्हाला ही मान्य नाही कारण एक तर घरपट्टी वाढण्याच कारण काहीच नाही, पत्र्याच शेड मारल म्हणून का घरपट्टी वाढ्याच काही कारण नाही, ऊन लागते, पाऊस येतो म्हणून शेड मार. जी घरपट्टीची नोटीस आल्या ती आवास्तव आणि अन्यायकारक आहे. ड्रेनेज लाईनचे पैसे लावले ड्रेनेज ला आमचे 2012 चाली खो ती लाईन फेल गेलेली आहे चालू नाही त्याचे पैसे लावले आहेत ना वृक्ष झाड लावलेत ना काय केलेत फवारणीला लोक येत नाहीत आणि घरपट्टी कशासाठी भरायची आम्ही मग आणि काही नसताना जर तुम्ही फोटो काढून जर असे अन्यायकारक जर घरपट्टी वसूल करत असाल तर ते अन्यायकारक आहे आणि हा जो रोश आहे त्यालाही आणखी एक कारण ठरल. ते म्हणजे पालिकेने घरांवर लावलेल्या नोटिसा, ज्यात इमारतीच्या भाड्याची जी रक्कम असेल त्यापैकी 57% रक्कम पालिकेला कर द्यावा लागू शकतो आणि तोही घरपट्टीच्या नावाखाली, इतकच नाही तर घरपट्टीच्या बरोबरीन उपयोगिता कर आणि त्यावर दरवर्षी 5% वाढ असही धोरण येण्याची चर्चा आहे. मुळामध्ये घरपट्टीची नोटीस लावत असताना त्याच्यावरती नेमकेपणाने किती फरक पडू शकतो? ल्यानंतर आम्ही आधी महापालिका प्रशासनाला गाठलं. माहितीसाठी सांगू इच्छतो की ही मोहीम घेत हाती घेताना आम्हाला जवळजवळ 29500 प्रॉपर्टीज असे सापडले आहे जे मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेच्या नोंदणीवरच नव्हता आणि कुठले प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी त्याच्याकडन आम्हाला देण्यात आली नव्हती. तर त्या प्रकारचे मालमत्ताची नोंद व्हावी त्या हेतूने हे पूर्ण मोहीम घेण्यात आलेली आहे. सगळ्यांना आवाहन करू इच्छतो की कुठल्याही प्रकारची करवाड. काय देणार एक प्रपोजल मांडू जे तुम्हाला मान्य महापालिकेने हद्दीतील 2,8086 मालमत्ता धारकांपैकी 1,35,503 मालमत्ता धारकांना करमूल्यांकन. नोटीस पाठवली आहे. त्यातल्या 22,110 मालमत्ता धारकांनी हरकत नोंदवली आहे. आणि पालकमंत्र्यांनीही महिनाभराची स्थगिती आणली आहे. त्यामुळे आता पुढच्या 30 दिवसांमध्ये पालिका कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलय. महापालिकेने घेतलेल्या या घरपट्टी वाढीच्या निर्णयाला आता सध्यातरी प्रशासनानं आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक महिन्याची स्थगित दिली असली तरी जोपर्यंत महापालिका प्रशासन नागरिकांना ही घरपट्टी अन्यायकारक. कशा पद्धतीने नाही हे जोपर्यंत पठवून देत नाही तोपर्यंत तरी लोक या ठिकाणी ही घरपट्टी भरण्याचा निर्णय घेतील का नाही याबाबत साशंता आहे त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील घरपट्टी याच्या विषयाबाबत आता नेमक पुढे काय होतय हेही पाहणं महत्त्वाच असणार आहे. कॅमरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.
All Shows

































