Narendra Modi : भारताला लॉटरी लागली, 2030 पर्यंत मालामाल होणार; मोदी-ट्रम्प भेटीनंतर 'मिशन 500' ची घोषणा
Narendra Modi US Visit : भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी अनेक करार करण्यात आलेले आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये भारताला फायदेशीर अशा अनेक गोष्टी साध्य करता आल्या. यामध्ये आता सर्वाधिक चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे भारत आणि अमेरिकेचे 'मिशन 500'. भारत आणि अमेरिकेने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी 'मिशन 500' ची घोषणा केली आहे. त्याचा भारतावर मोठा परिणाम होणार असून येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय.
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मोदी आणि ट्रम्प यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीत F-35 लढाऊ विमानाच्या विक्रीसह भारतासोबत पुढील 10 वर्षांसाठी संरक्षण भागीदारीवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारण्याचे आश्वासन देण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पीएम मोदींसोबत जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, या वर्षापासून आम्ही भारताला लष्करी विक्री अनेक अब्ज डॉलर्सने वाढवू.
भारत-अमेरिकेचे 'मिशन 500' काय आहे?
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीझनुसार, मिशन 500 अंतर्गत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
दोन्ही नेत्यांनी आपले नागरिक अधिक समृद्ध, देश मजबूत, अर्थव्यवस्था अधिक नाविन्यपूर्ण आणि पुरवठा साखळी अधिक लवचिक बनवण्यासाठी व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे वचन दिले आहे. त्यांनी निष्पक्षता, राष्ट्रीय सुरक्षा आणि रोजगार निर्मिती सुनिश्चित करणाऱ्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिका-भारत व्यापार संबंध अधिक दृढ करण्याचे वचन दिले.
भारत श्रीमंत कसा होणार?
भारत-यूएस मिशन 500 च्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी नवीन, वाजवी व्यापार अटींची गरज ओळखून, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 2025 पर्यंत परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करार (BTA) च्या पहिल्या टप्प्यावर वाटाघाटी करण्याची योजना जाहीर केली.
दोन्ही नेत्यांनी चर्चेसाठी वरिष्ठ प्रतिनिधींची नियुक्ती करण्यास वचनबद्ध केले, जे द्विपक्षीय व्यापार संबंध 'कॉम्पॅक्ट'च्या आकांक्षा पूर्णपणे प्रतिबिंबित करतात याची देखील खात्री करतील.
तसेच पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान घोषित करण्यात आले होते की, कॉम्पॅक्ट (कॅटॅलिटिक अपॉर्च्युनिटीज फॉर मिलिटरी पार्टनरशिप, एक्सेलरेटेड कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी) हा राष्ट्रांमधील 'सहकाराच्या प्रमुख स्तंभांमध्ये परिवर्तनात्मक बदल' घडवून आणणारा एक नवीन उपक्रम आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

