Petrol Diesel Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा? आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
Petrol Diesel Price Today : आज सलग 11व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशभरात 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या इंधनाच्या किमती स्थिर आहेत.
Petrol-Diesel Price Updates Today 17 April 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे इंधनाचे दर जारी केले आहेत. आज 17 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रीय बाजारात सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या 11 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या असून त्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. अशा परिस्थितीतयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने हैराण झालेल्या जनतेला किमती स्थिर असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्यापही पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या वर आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत प्रति लिटर 10 रुपयांनी महागले आहेत. मात्र, 6 एप्रिलपासून इंधन दर स्थिर आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, 17 एप्रिल 2022 रोजी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर
या आधी भाव कधी वाढले होते?
याआधी गेल्या वेळी 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली होती. स्थानिक करानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये भिन्न आहेत.
देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय?
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 | 104.77 |
दिल्ली | 105.41 | 96.67 |
चेन्नई | 110.85 | 100.94 |
कोलकाता | 115.12 | 99.83 |
कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा किंचित वाढ झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात प्रतिबॅरल 100 डॉलरपर्यंत खाली आलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीनं पुन्हा शंभरी पार केली आहे. यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना ब्रेक लागल्याने तेल कंपन्या पुन्हा महागाई वाढवू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Jahangirpuri Violence : दिल्लीच्या जहांगीरपुरीतील गोंधळानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट, पोलीस प्रशासनाला 'या' सूचना
- MoD Recruitment 2022 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 'या' पदांवर भरती, 50 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना करता येणार अर्ज
- Viral Video : ससा आणि सापाची झुंज पाहिलीय का? तुफान लढतीचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha