Health Minister on Black Fungus : म्युकोरमायकोसिसपासून संरक्षणासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या सूचना
डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्युकोरमायकोसिस या बुरशीबद्दल माहिती दिली, या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की म्युकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे जो प्रामुख्याने वैद्यकीय आरोग्य समस्या असलेल्या लोकांना प्रभावित करतो, ज्यामुळे पर्यावरणीय रोगजनकांशी लढा देण्याची त्यांची क्षमता कमी होते.

नवी दिल्ली: कोविड 19 च्या काही रुग्णांना आता म्युकरमायकोसिस हा आजार होतोय, ही एका प्रकारची बुरशी आहे जी कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये आढळतेय. हा बुरशीजन्य आजार कसा रोखला जाऊ शकतो याबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी काही उपयुक्त सूचना दिल्या.
#Mucormycosis, commonly known as '#BlackFungus' has been observed in a number of #COVID19 patients recently.
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 14, 2021
Awareness & early diagnosis can help curb the spread of the fungal infection. Here's how to detect & manage it #IndiaFightsCorona @MoHFW_INDIA pic.twitter.com/lC6iSNOxGF
डॉ. वर्धन यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं आहे की हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे जो प्रामुख्याने वैद्यकीय आरोग्य समस्या असलेल्या लोकांना प्रभावित करतो. आरोग्यमंत्र्यांनी या संसर्गाच्या लक्षणांची माहिती दिली, डोकेदुखी, डोळे / नाकभोवती वेदना / लालसरपणा, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या आणि बदललेली मानसिक स्थिती या गोष्टी रुग्णांमध्ये आढळत असल्यास त्यांनी ताबडतोब उपचार घेण्यास सुरुवात करावी, असा सल्ला देखील दिला.
Mucormycosis म्हणजे नेमकं काय? म्युकर मायकोसिस होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी? डॉ. तात्याराव लहाने
Mucormycosis हा संसर्ग होऊ नये यासाठी स्वत:चं संरक्षण कसं करावं आणि काय टाळावं:
काय करावं:
हायपरग्लाइकेमिया नियंत्रित करा
मधुमेहींनी आणि कोरोनातून बरे झालेल्या, कोरोना झालेल्या रुग्णांनी ग्लुकोज स्तराचे निरीक्षण करा
निर्णायकपणे स्टिरॉइड वापरा
ऑक्सिजन थेरपी दरम्यान ह्युमिडिफायर्ससाठी स्वच्छ, निर्जंतुकीकरण पाण्याचा वापर करा
Anti-Biotics / Anti-Fungal योग्य पद्धतीने वापरा
काय टाळावं:
कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Blocked Nose आणि सायनस्टिक बॅक्टेरियाच्या रुग्णांना यात गृहित धरू नका
बुरशीजन्य एटिओलॉजी शोधण्यासाठी योग्य त्या चाचण्या करण्यात अजिबात संकोच करू नका
म्युकोरमायकोसिसवर उपचार सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण वेळ गमावू नका
काय आहे ‘म्युकोरमायकॉसिस’?
- कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
- सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीची वाढ होते.
- कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.
- तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
म्युकोरमायकॉसिसची लक्षणे काय?
- चेहऱ्यावर सूज येणे
- गाल दुखणे
- डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे
- डोके दुखणे, नाक दुखणे
- रक्ताळ किंवा काळसर जखम
Mucormycosis : 'म्युकोरमायकॉसिस'च्या उपचारासाठीच्या इंजेक्शनचा तुटवडा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
