एक्स्प्लोर
भाजप आमदाराची दादागिरी, 'लेडी सिंघम'ला अश्रू अनावर

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये, भाजप आमदारानेच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी बाचाबाची केली. धक्कादायक म्हणजे लेडी सिंघम म्हणून परिचीत असलेल्या आयपीएस चारु निगम यांना भर रस्त्यात अश्रू अनावर झाले.
काय आहे प्रकरण?
गोरखपूरमध्ये दारु गुत्ते आणि कच्च्या दारुविरोधात रास्तारोको करण्यासाठी महिला रस्त्यावर उरलेल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचवेळी हा रास्ता रोको हटवण्यासाठी आयपीएस अधिकारी चारु निगम फौजफाट्यासह दाखल झाल्या. त्यांनी हा जाम हटवण्याचा प्रयत्न सुरु केला.
त्याचवेळी आंदोलक महिलांनी पोलिसांवरच लाठ्यांनी हल्ला चढवला. यात चारू निमग जखमीही झाल्या. पण त्याचवेळी या महिलांची बाजू घेत भाजप आमदार राधामोहन दास पोहोचले आणि त्यांनी थेट आयपीएस अधिकारी चारु निगम यांनाच अपमानास्पद वागणूक दिली.
आमदारांच्या या वर्तनाने चारु निगम खचल्या आणि त्यांना रडू कोसळलं. आमदारांच्या या वर्तनावर मात्र चहू बाजूने टीका होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
