(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4575 रुग्ण, 145 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4 हजार 575 नवीन रुग्ण आढळले असून 145 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 3 हजार 993 रुग्ण आणि 108 मृत्यूची नोंद झाली.
Coronavirus Cases Today in India : देशात आज कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 4 हजार 575 नवीन रुग्ण आढळले असून 145 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 3 हजार 993 रुग्ण आणि 108 मृत्यूची नोंद झाली. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण संख्या वाढली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 46 हजार 962 इतकी कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 59 हजार 442 झाली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 335 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 13 हजार 566 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत सुमारे 179 कोटी डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे आतापर्यंत 179 कोटी डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 18 लाख 69 हजार 103 डोस देण्यात आले. आतापर्यंत 179 कोटी 33 लाख 99 हजार 555 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2,08,56,585) प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मंत्र्यांच्या मुलीनं केलं पळून लग्न, आता जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षणाची मागणी
- UP Election 2022 : ईव्हीएम मशीनच्या व्हायरल व्हिडीओबाबत निवडणूक आयोगानं काय म्हटलं? निकालापूर्वी चोरीचा अखिलेश यादवांचा आरोप
- UP Election 2022: दुर्बिणीने EVM वर लक्ष ठेवत आहेत समाजवादी पक्षाचे उमेदवार, जाणून घ्या काय आहे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha