एक्स्प्लोर

Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!

Ajit Pawar Speech : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील पहिल्या भाषणात महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय.

मुंबई : राज्यात महायुती सरकार (Mahayuti Government) पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केली. आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला. तर  लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय, गरम वाटतंय की कसं तुम्हीच बघा,  असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला डिवचले. 

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देतो. नेतृत्त्व गुणांची त्यांची ही पोचपावती आहे. ⁠तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून झाली. मी तुम्हाला म्हटलो की, लोकसभा निवडणूकीत तुम्ही उभं रहा, जर अपयश आलं तर तुम्हाला या सभागृहात संधी देऊ, असे म्हटले होते. ⁠मी तुम्हाला इकडे आणले आणि देवेंद्र फडणवीस हे तु्म्हाला तिकडे घेऊन गेले. 

अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला

अजित पवार पुढे म्हणाले की, निवडणूक काळात काही लोक संविधान हातात घ्यायचे. मात्र संविधान हातात घेतलं की, आदर वाढतो. ⁠म्हणजे बाकीच्यांना आदर नाही का? एकनाथ शिंदे म्हणाले की कोर पान होती. त्यात मला जायचे नाही, असे त्यांनी म्हटले. तर विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीची शपथ घेतली नाही. यावरून अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 'मी म्हटलं होतं की आज नाही शपथ घेतली तर उद्या घेतील आणि तसेच झाले. निवडणूक घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.  काही तरी स्टंटबाजी करायची. आम्हाला ही मारकडवाडी संदर्भात आदर आहे. ⁠लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला. 

आता तरी डोळे उघडा

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय गरम वाटतंय की कसं तुम्ही बघा, असे म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीला डिवचले. 237 महायुतीचे निवडून आले. ⁠कधीही ही एवढे निवडून आले नाही. ⁠आता तरी डोळे उघडा. लाडक्या बहि‍णींनी आम्हाला इथं बसवलंय, असा फटकेबाजी अजित पवारांनी केली.  

गुलाबी जॅकेट मुख्यमंत्र्यांना दिलंय

दरम्यान, अजित पवार हे विधानसभा निवडणुकीआधी गुलाबी जॅकेट परिधान करत होते. मात्र आज दुसऱ्या रंगाचे जॅकेट परिधान केल्याने काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी अजित पवार यांना गुलाबी जॅकेट कुठे आहे. असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार म्हणाले की,  गुलाबी जॅकेट मुख्यमंत्र्यांना दिलंय काही अडचण आहे का? आता विरोधकांना कलर ही ओळखता येत नाही, असा टोला त्यांनी यावेळी नाना पटोले यांना लगावला. 

आणखी वाचा 

Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

APMC Kesari Mango : 5 डझानाच्या पेटीला 15 हजारांचा भाव, APMCत आंब्याची पहिली पेटी दाखल!Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नयेABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 06 January 2025Vijay Wadettiwar :हत्या, आरोपी, पोलीस आणि चौकशीचा थरार;आरोपांनी गाजलेली वडेट्टीवारांची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Video: मनोज जरांगेंचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; गुंडांना बोलायचे नाही का, आमचे मुडदे पडू द्यायचे का?
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Neelam Gorhe: ... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
Embed widget