एक्स्प्लोर

डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवणं सोपंय ? जाणून घ्या...

Electric Kit Into An Old Car : दिल्ली सरकार 10 वर्ष जुन्या डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवून वापराला परवानगी देणार आहे. मात्र, डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवणं शक्य आहे का ?

Electric Kit Into An Old Car :  दिल्लीमध्ये डिझेल कारमालकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार 10 वर्ष जुन्या डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवून वापराला परवानगी देणार आहे. मात्र, डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवणं शक्य आहे का ?

Electric Kit Into An Old Car :  दिल्लीमध्ये डिझेल (Diesel Car) कारमालकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार 10 वर्ष जुन्या डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट (Electric Vehicle Conversion) बसवून वापराला परवानगी देणार आहे. मात्र, डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवणं शक्य आहे का ? तसेच त्याचा खर्च किती असेल असे प्रश्न आता उपस्थित होतं आहेत. परिवहन विभागाकडून इलेक्ट्रिक किट निर्मात्यांना पॅनेलमध्ये समाविष्ट केल्यानंतर किटसंदर्भातील इतर बाबी स्पष्ट होतील. कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्यात मोठी अडचण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कार आणि त्यानुसार इलेक्ट्रिक किट तयार करणे, ही एक मोठी लांबलचक प्रक्रिया असेल. मात्र, किट निर्मात्यांसाठी हे शक्य आहे का? यासाठी उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारच्या मूलभूत उदाहरणासह तपास करावा लागेल. उदाहरणार्थ, नॉर्थवे मोटरस्पोर्ट ही पुण्यातील इलेक्ट्रिक किट तयार करणारी कंपनी आहे आणि ती डिझायर सारख्या लोकप्रिय कारसाठी किट ऑफर करते.

डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवणं कितपत सोपं आहे, याबाबत मोठा प्रश्न आहे. कारचं इंजिन काढून केवळ इलेक्ट्रिक किटचा प्लग लावून वापर करता येईल, असं किट बनवणाऱ्या कंपन्यांनी म्हटलंय. कारमधील काही महत्त्वाचे भाग जसे की, इन्स्ट्रमेंट क्लस्टर किंवा गिअरबॉक्स देखील तसेच राहतील. दरम्यान, डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवल्यानंतर या कारना इलेक्ट्रिक कारची श्रेणी मिळण्याबाबत प्रश्न उद्भवू शकतो.

दुसरा प्रश्न पूर्ण चार्ज केल्यानंतर कार किती अंतर कापेल आणि यासाठी खर्च किती येईल? किट एक वेळा चार्ज केल्यानंतर कार 200 किमी ते 250 किमीपर्यंत धावू शकेल असा अंदाज आहे. जे शहराच्या वापरासाठी पुरेसे असून टाटा टिगोरईव्ही (Tata Tigor EV) सारख्या ग्राउंड अप ईव्हीसारखे आहे. अशा प्रकारे श्रेणी उत्तम आणि व्यावहारिक आहे. साधारणपणे ईव्ही किटसाठी लागणार खर्च 5 लाख किंवा त्याहून अधिक असेल. त्यामुळे इलेक्ट्रिक किट बसवताना जुन्या कारवर एवढा खर्च करण्याची तयारी अथवा जुनी कार विकून नवी कार घेण्याचा निर्णय ग्राहकांना घ्यावा लागेल. कारमध्ये किट बसवल्यानंतर चार्जिंग आणि सर्व्हिसिंगच्या समस्यांना सामोरं जावं लागेल.

येत्या काळात इव्ही किट असणाऱ्या कार दिल्लीच्या रस्त्यांवर दिसू शकतात. इलेक्ट्रिक किटच्या तपशीलांबाबत अधिक स्पष्टता आल्यावर यावर निर्णय होईल.

महत्त्वाच्या बातम्या :

इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रांचे जाळे! मुंबईत 134 इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट उभारणार 

Audi Q 5 : ऑडीची 'क्यू 5' गाडीचं मुंबईत अनावरण, जाणून घ्या 5 फिचर्स

Skoda Slavia First Look: स्कोडाच्या स्लाव्हियाचा फर्स्ट लूक समोर, काय आहे खासियत? घ्या जाणून

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही; सदाभाऊ खोत स्पष्टच म्हणाले, मला राज्यपाल करावे
कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही; सदाभाऊ खोत स्पष्टच म्हणाले, मला राज्यपाल करावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : वक्फ बोर्ड विधेयकावरुन ठाकरेंना टोला, राऊतांचा प्रश्न येताच फडणवीस म्हणाले..Nilesh Lanke LS Speech : वक्फ बोर्डाचं विधेयक पाहिलं तर असं वाटतं की...लंकेंचं स्फोटक भाषण!Shrikant Shinde LS Speech : टोले,चिमटे अन् कोपरखळ्यांनी गाजलं श्रीकांत शिंदेंचं वक्फवरील भाषण!Arvind Sawant on Waqf Board : वक्फ सुधारणा बिल यामागे धार्मिक हेतू आहे का? : अरविंद सावंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही; सदाभाऊ खोत स्पष्टच म्हणाले, मला राज्यपाल करावे
कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही; सदाभाऊ खोत स्पष्टच म्हणाले, मला राज्यपाल करावे
Video : अखिलेश यादव म्हणाले, तुम्हाला अजून भाजपचा अध्यक्ष निवडता आला नाही, अमित शाह संसदेत ताडकन जागेवरच उभे राहिले अन्...!
Video : अखिलेश यादव म्हणाले, तुम्हाला अजून भाजपचा अध्यक्ष निवडता आला नाही, अमित शाह संसदेत ताडकन जागेवरच उभे राहिले अन्...!
गुगल मॅपने हायवेवर केला घात, रॉन्ग साईडने चाललेली कार कंटनेरच्या धडकेत थेट हवेत उडाली; 4 मित्र 1 तास कारमध्ये तडफडले, दोन तरुणींचा करुण अंत
Video : गुगल मॅपने हायवेवर केला घात, रॉन्ग साईडने चाललेली कार कंटनेरच्या धडकेत थेट हवेत उडाली; 4 मित्र 1 तास कारमध्ये तडफडले, दोन तरुणींचा करुण अंत
आप पुना जा के बोलो, बँक मॅनेजरचं मनसैनिकांना उत्तर; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचा महाराष्ट्र बँकेत मराठीचा आग्रह
आप पुना जा के बोलो, बँक मॅनेजरचं मनसैनिकांना उत्तर; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचा महाराष्ट्र बँकेत मराठीचा आग्रह
राज्य सरकारची 'आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र' समिती गठीत, डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे मोठी जबाबदारी
राज्य सरकारची 'आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र' समिती गठीत, डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे मोठी जबाबदारी
Embed widget