एक्स्प्लोर

कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही; सदाभाऊ खोत स्पष्टच म्हणाले, मला राज्यपाल करावे

इंदापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना, गोपीचंद पडळकरांना मंत्री करा आणि मला राज्यपाल तरी करा, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

पुणे : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन विरोधकांकडून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तसेच, शेतकऱ्यांकडून देखील कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झाले असून एफआरपीच्या दराबाबत सरकारच्या धोरणावर टीका करत आहेत. तसेच, शेतकरी कर्जमाफीवरुनही ते सरकारला लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घुमजाव केल्याचं दिसून येत आहे. आजच जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांच्या (Farmers) चुकीमुळे नाही तर ते सरकारच्या धोरणांमुळे आहे. या कर्जाची जबाबदारी केंद्राने आणि राज्याने घ्यावी, परंतु कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही, असे स्पष्टपणे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे मला राज्यपाल करावं, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. 

इंदापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना, गोपीचंद पडळकरांना मंत्री करा आणि मला राज्यापल तरी करा, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. तसेच, आम्ही अनेक आंदोलन केली, लाठ्या-काट्या खाल्ल्या, पण कधीही भावनिकतेला हात घालून आंदोलने उभी केली नाहीत. ज्या शरद जोशींच्या विद्यापीठात आम्ही शिकलो, वाढलो त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढायला शिकवलं. शेतकऱ्यांचं दारिद्र्य घालवायचं असेल तर घटनेतील शेड्यूल 9 रद्द  करावे लागेल. मूळ संविधान जनतेसमोर ठेवावे लागेल, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते काढून टाका. आजचा आवश्यक वस्तू कायदा, जमीन कमाल धारणा कायदा हे सर्व कायदे काढून टाका. एकदा का बंधने उठवली की शेतकऱ्यांच्या कंपन्या उभ्या राहतील. परंतु, हे कायदे रद्द केले तर शेतकऱ्यांच्या जमिनी संपुष्टात येतील, शेतकरी भूमिहीन होईल या भंपक कल्पना काही शेतकरी नेते मांडत आहेत ते पूर्णपणे चुकीच आहे, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले. 

कर्जमाफी हा शेतीवरचा उपाय नाही

खुली अर्थव्यवस्था शेती क्षेत्रात आली पाहिजे. शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या पाहिजेत, जगातील जागतिक तंत्रज्ञान त्याला मिळालं पाहिजे. मोठी गुंतवणूक शेतीत झाली तरच शेती तग धरू शकते, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. तसेच, आजच जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नाही तर ते सरकारच्या धोरणांमुळे आहे. या कर्जाची जबाबदारी ही केंद्राने आणि राज्याने घ्यावी परंतु कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही, असेही त्यांनी म्हटले. 

एफआरपीबाबतही मांडली भूमिका

शेतकरी विरोधी जे कायदे शेड्यूल 9 मध्ये आहेत, त्यामध्ये अत्यावश्यक वस्तू कायदा, कमाल जमीन धारणा कायदा हे पहिल्यांदा रद्द करा. पायाभूत सुविधा उभा राहतील, शेतीला भांडवल कर्जरूपाने उभा राहील. मात्र, ही सर्व बंधने ठेवून शेती क्षेत्रावरचा राबणारा माणूस हा कायम गुलाम राहिला पाहिजे. गुलामावर राज्य करता येतं, आत्मनिर्भर माणसावरती राज्य करता येत नाही. म्हणून साखर कारखानदारी ही मूठभर लोकांच्या हातात ठेवली गेली, असे म्हणत एफआरपीच्या मुद्द्यावरूनही सदाभाऊ खोत यांनी भूमिका स्पष्ट केली.  

खोत यांची शरद पवारांवर टीका

उसाची कारखानदारी आमच्या हातात राहिली तर गावाचा शेतकरी आमच्या हातात राहील, सोसायट्या आमच्या हातात राहतील यातून आम्हाला जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आमदारकीच्या निवडणुका जिंकता येतील. शरद पवार हे अनेक वर्ष केंद्रात मंत्री होते, त्यांचं केंद्रात वजन होतं. परंतु, दोन साखर कारखान्यांच्या मधलं अंतर पवार साहेब काढू शकले नाहीत. याचं कारण की 25 किलोमीटरच्या आतील शेतकऱ्यांच्या घरावर आपल्याला दरोडा घालता आला पाहिजे आणि तो कायदेशीर घालता आला पाहिजे, असे म्हणत खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. आमची मागणी आहे की दोन कारखान्यांमधील 25 किलोमीटर अंतराची अट काढून टाका, हे म्हणतात की कारखानदारी शेतकऱ्यांची आहे. जर अंतर काढलं तरी कारखानदारी मोडीत निघेल, खाजगी लोक येतील. दुधात खासगी लोक पण आले आणि सहकारातील पण आहेत पण काय वाईट झालं? असा सवालही खोत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा

आप पुना जा के बोलो, बँक मॅनेजरचं मनैसिकांना उत्तर; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचा महाराष्ट्र बँकेत मराठीचा आग्रह

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Bhendwal Ghatmandni Bhavishyvani 2026: देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
Satara : एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget