पीएफ अकाऊंटला KYC अपडेट कसं कराल? फक्त 10 स्टेप्समध्ये जाणून घ्या A To Z प्रक्रिया
Provident Fund KYC Account : प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीएफ खात्याला जर केवायसी केलं नसेल तर त्यातील पैसे काढण्यास अडचणी येतात. त्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती देत आहोत.

मुंबई : आपल्यापैकी अनेक जणांना पीएफचा पैसा काढायचा आहे, पण त्यांची KYC पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पीएफचे पैसे काढण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. पीएफला केवायसी अपडेट कसे करायचे (Provident Fund KYC Account) असा प्रश्न अनेकांना पडतोय. त्याची माहिती आपण दहा स्टेप्समध्ये जाणून घेऊयात
EFPO KYC Update Online Process : पीएफ अकाऊंटचे KYC अपडेट कसं करायचं?
1. सर्वात आधी तुम्हाला सर्च ब्राऊझरवर Login Epfo असं सर्च करायचं आहे.
2. त्यानंतर तुम्हाला employee provident fund ची वेबसाईट आली असेल. त्यावर क्लिक करा.
3. आता तुमच्यासमोर होम पेजवर ओपन झालं असेल. त्यावर समोर तुम्हाला KYC Updation (Member) यावर क्लिकवर करा.
4. त्यानंतर आता तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड टाकून Captcha कोड भरायचा आहे. त्यानंतर साईन इन करून घ्या.
5. साईन इन केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेला असेल. तो इथे भरा.
6. त्यानंतर पुन्हा एक पेज आलं असेल. त्यात तुम्हाला तुमची माहिती समोर दिसली असेल. आता तुम्हाला मॅनेज या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
7. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावर KYC चं ऑप्शन आलं असेल.
8. त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल. आता इथे तुम्हाला नेमकं केवासी कशाची करायची आहे. जसे की, बँक अकाऊंट, पॅन कार्ड, पासपोर्ट ते सिलेक्ट करा. आपल्याला बँक खात्याची केवायसी करायची असल्याने आपण इथे बँक निवडू.
9. आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन झाला असेल. त्यावर तुम्हाला तुमचं नाव दिसेल. आता तुम्हाला जो बँक अकाऊंट पीएफ खात्याला केवायसी करायचा आहे तो नंबर इथे टाका. त्यानंतर IFSC कोड भरा आणि टर्म अॅण्ड कंडिशनला ओके करून सेव्ह करा.
10. त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमाकांवर एक ओटीपी येईल. तो इथे भरा आणि सबमिट करा.
अशा प्रकारे तुमच्या पीएफ अकाऊंची केवायसी झालेली असेल.

























