गुगल मॅपने हायवेवर केला घात, रॉन्ग साईडने चाललेली कार कंटनेरच्या धडकेत थेट हवेत उडाली; 4 मित्र 1 तास कारमध्ये तडफडले, दोन तरुणींचा करुण अंत
कारमध्ये ठेवलेल्या मोबाईलमध्ये गुगल लोकेशन सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गुगल मॅपच्या लोकेशनवरून गाडी चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून रॉन्ग साईडने जात असलेल्या कारला कंटेनरने धडक दिली. यानंतर कार हवेत उडून दूर फेकली गेली. या भीषण अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाला. अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. कारचे चारही गेट लॉक होते. चौघे मित्र तासभर आतमध्ये तडफडत राहिले. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी आणि घटनास्थळी उपस्थित लोकांनी कारचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरादाबादमध्ये दिल्ली-लखनौ महामार्गावरील मुंधापांडे पोलिस चौकीजवळ मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. कारमध्ये ठेवलेल्या मोबाईलमध्ये गुगल लोकेशन सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गुगल मॅपच्या लोकेशनवरून गाडी चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संपूर्ण घटना जाणून घ्या
शिवानी (25), सिमरन (26), राहुल (27), आणि संजू (26, रा. सुभाष, रा. रोहतक, हरियाणा) या चौघेजण नैनिताल येथील बाबा नीम करोली येथे भेट देऊन घरी परतत होते. गुगल मॅपने कार हायवेच्या एका कटवर चुकीच्या बाजूला नेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे लखनौ-दिल्ली महामार्गावरील मुंढापांडे पोलिस चौकीपासून काही अंतरावर झिरो पॉइंटवर कार समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. कंटेनरमध्ये पुलाच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या सिमेंटचे मोठे पाईप भरलेले होते. टायरने भरलेला ट्रकही आदळला आणि उलटला.
दुर्घटना: मुरादाबाद जीरो प्वाइंट पर हुई दुर्घटना pic.twitter.com/VUe4g4LP5C
— Rajat Kumar (@rajatrampur22) April 1, 2025
कार धडकेनंतर हवेत उडून ढिगाऱ्यात कोसळली
घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, धडकेनंतर कार हवेत उडाली आणि नंतर पोलिस चौकीजवळील ढिगाऱ्यावर पडली. अपघातानंतर कारचे चारही दरवाजे लॉक झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. पोलीस कर्मचारीही चौकीतून धावत तत्काळ पोहोचले. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर कारचे गेट लोखंडी रॉडने तोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. कारमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी होत्या. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. जखमी तरुणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही उपचारासाठी पुढे रेफर करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या























