Shani Dev : साडेसाती म्हणजे संकट नव्हे, शनी महाराज माणसाचं आयुष्य बदलून टाकतात, राशीचक्रकार शरद उपाध्ये म्हणाले...
Shani Dev : शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता, न्यायदेवता असं म्हणतात. याचं कारण म्हणजेच शनी (Lord Shani) प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळेच अनेक लोक शनीच्या ढैय्या, साडेसाती आणि महादशापासून फार दूर राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच 30 मार्च रोजी शनीने राशी परिवर्तन केलं आहे. शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे.
मात्र, शनीच्या साडेसातीचा अनेकजण नकारात्मक विचार करतात. साडेसाती आपल्या मागे लागली म्हणजे आपल्याबरोबर आता वाईटच गोष्टी घडणार, किंवा आपल्याला अपयशालाच सामोरं जावं लागेल याबद्दल अनेकांचा गैरसमज आहे. याच संदर्भात नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टच्या माध्यमातून राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी शनीच्या साडेसातीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या जाणून घेऊयात.
शनी मारक नाही तर तारक
राशीचक्रकार शरद उपाध्ये सांगतात की, अनेकांचा असा गैरसमज आहे की, शनी मीन राशीत आल्यामुळे मीन राशीच्या लोकांना शनी आता प्रचंड त्रास देणार. मात्र, शनीचे होणारे त्रास नसतात. शनी वैराग्याचे शिक्षण देतो. विरक्तीचे. आपल्या घरातील आजोबांप्रमाणे शनी आहे. ज्याप्रमाणे आजोबा आपण सुधारण्यासाठी आपले कान धरतात. त्याप्रमाणे शनी आपल्याला संयम शिकवतो. समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करायला शिकवतो.
साडेसातीनंतर माणूस होतो अंतर्मुख
शनी मेहनत करायला लावतो. मीन राशीत शनी आपल्यामुळे मीन राशीचे लोक आता मेहनतीने, कष्टाने काम करणार. तसेच, त्याचा त्यांना चांगला फायदाही होणार आहे. शनीच्या साडेसातीनंतर माणूस खूप अंतर्मुख होतो. आणि आपल्यातील चांगली कौशल्य बाहेर काढण्यास तो मदत करतो. त्यामुळे शनीला आपण आपल्या मित्राप्रमाणे समजलं पाहिजे.
राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी शनीच्या साडेसातीला अतिशय सुवर्णकाळ सांगितलं आहे. उदा.. शनीच्या साडेसातीमुळे आपल्याला जो त्रास होतो. त्या त्रासातून आपल्याला कळतं की आपली माणसं कोण आहेत. शनी आपल्याला माणसं ओळखण्यासाठी आपले डोळे उघडण्याचं काम करतो. तो एक प्रकारे आपलं प्रबोधन करत असतो.
मीन, कुंभ आणि मेष या राशी नशिबवान
शनीच्या साडेसातीला घाबरायचं नाही. मीन, कुंभ आणि मेष या राशी नशिबवान आहेत. या राशींनी आपल्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवावं. आपल्या आयुष्यातील गोष्टींचं सत्य दर्शन घडवणारा म्हणजे शनी ग्रह. आणि तो काळ म्हणजे शनीची साडेसाती.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















