एक्स्प्लोर

Video : अखिलेश यादव म्हणाले, तुम्हाला अजून भाजपचा अध्यक्ष निवडता आला नाही, अमित शाह संसदेत ताडकन जागेवरच उभे राहिले अन्...!

दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपुरात गेले होते. अखिलेश या दौऱ्याचा संदर्भ देत होते.

Akhilesh Yadav on Amit Shah : लोकसभेत वक्फ दुरुस्ती (Waqf Amendment Bill) विधेयकावर चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीला होत असलेल्या विलंबावरून खोचक शब्दात टोला लगावल्यानंतर एकच हशा पिकला. अखिलेश म्हणाले की, भाजपमध्ये कोण मोठा याची स्पर्धा सुरू आहे. जो पक्ष म्हणतो तो जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरवता येत नाही.

अमित शाहांनी जागेवरून उठत उत्तर दिलं 

यावर गृहमंत्री अमित शाह आपल्या जागेवरून उठले आणि हसत हसत म्हणाले की, समोरच्या सर्व पक्षांपैकी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड फक्त 5 जणांनी कुटुंबानेच करायची आहे. आमच्या इथे करोडो लोक आहेत. वेळ लागेल. अखिलेशजी हसताना हे म्हणाले, म्हणूनच मीही हसत हसत म्हणतोय. तुमच्या (अखिलेशच्या) जागी येण्यास वेळ लागणार नाही. मी म्हणतो, तुम्ही 25 वर्षे अध्यक्ष राहणार आहात. यानंतर अखिलेश हसत हसत पुन्हा म्हणाले की, नुकताच नागपूरचा प्रवास केला आहे आणि सोशल मीडियावर गुपचूप काय सुरू आहे. म्हणजे 75 वर्षांच्या मुदतवाढीचा प्रवास नाही? असे म्हणत पुन्हा टोला लगावला. 

दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपुरात गेले होते. अखिलेश या दौऱ्याचा संदर्भ देत होते. 

या महिन्यात भाजपच्या नवीन अध्यक्षाची घोषणा

दरम्यान, या महिन्यात भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मार्च रोजी मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या बैठकीत नव्या अध्यक्षाच्या नावावर चर्चा झाली. मोदी नागपुरातून परतल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा झाली. पंतप्रधानांनी विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष यांच्यासोबत राज्यांच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी नड्डा आणि बीएल संतोष यांना या महिन्यात भाजप अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण करण्यास सांगितलं आहे. भाजपने आतापर्यंत 13 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी 19 राज्यांमध्ये निवडणुका पूर्ण कराव्या लागतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यापर्यंत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह उर्वरित बहुतांश राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नावे जाहीर केली जातील. म्हणजेच 50 टक्के राज्यांतील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होऊ शकते.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Embed widget