हेल्मेटचा पट्टा नीट बांधा अन्यथा पावती फाटलीच, दुचाकीस्वारांसाठी नवी वाहतूक नियमावली; हेल्मेट घेण्यापूर्वी 'या' चूका टाळा
Helmet Rules: हेल्मेट असेल तर जीव वाचण्याची शक्यता अधिक आहे . पण हेल्मेट वापरण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे .

Challan On Helmet: आपल्यापैकी अनेक जण दुचाकीने प्रवास करतात . पण हेल्मेट घातलं तरी आता तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. 2025 च्या नवीन वाहतूक नियमांनुसार डोक्यावर हेल्मेट असलं तरी पावती फाडली जाऊ शकते. आपल्याकडे दंड बसू नये या भीतीने का असेना डोक्यावर हेल्मेट घातला जातो .पण हेल्मेट डोक्यावर घातलं तरीही एका छोट्याशा चुकीमुळे मोठा भुर्दंड बसू शकतो हे तुम्हाला माहिती का ? सुरक्षेसाठी हेल्मेट घालणं गरजेचंच आहे, पण हेल्मेट घातल्यानंतरही तुमच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे .हेल्मेट आणि ट्राफिकचे नवीन नियम नेमके काय आहेत समजून घेऊयात . (Helmet Traffic Rules)
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अतिशय महत्त्वाचे आहे . रस्त्यांवरती होणारे अपघात सध्या खूप आहेत .अपघात होण्याची शक्यता यात डोक्याला मार लागल्यास मृत्यूही होऊ शकतो मात्र हेल्मेट असेल तर जीव वाचण्याची शक्यता अधिक आहे . पण हेल्मेट वापरण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे .2025 च्या नवीन वाहतूक नियमानुसार हेल्मेट आयएसआय मार्क केलेले आणि ब्रँडेड असणे ही आवश्यक आहे .आणि जर तुम्ही हेल्मेटचा पट्टा योग्यरित्या बांधला नसेल तरीही तुम्हाला दंड भरावा लागू शकतो .
हेल्मेटचा पट्टा नीट बांधा अन्यथा पावती फाडावी लागणार !
- वाहतुकीच्या नवीन नियमानुसार तुम्ही हेल्मेट घातले असेल पण पट्टा व्यवस्थित बांधला नसेल तरीही वाहतूक पोलीस तुम्हाला दंड छोटा होऊ शकतात .पण हा नियम विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे फक्त हेल्मेट घालून दंड टाळण्याचा प्रयत्न करतात परंतु सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात .हेल्मेट चा पट्टा नीट बांधलेला नसेल तर वाहतूक पोलीस किमान 1000 रुपयांची पावती फाडू शकतात .
- अनेकदा घाईगडबडीत हेल्मेट व्यवस्थित घातले जात नाही किंवा अनेक जण दुचाकी चालवताना सोबत असावे गरज पडली तर लावू अशा विचारात दुचाकी चालवताना हेल्मेट हातात घेऊन जातात किंवा कुठेतरी अडकवतात .जर असे करताना दिसला तर वाहतूक पोलीस दोन हजार रुपयांचा दंड आकारू शकतात .हा नियम दुचाकी स्वरांना हेल्मेट योग्यरित्या वापरण्यासाठी बनवण्यात आला आहे .
- नवीन नियमानुसार तुम्ही आयएसआय मार्क असलेले ब्रँडेड हेल्मेट घालणे अपेक्षित आहे .स्थानिक आणि बनावट हेल्मेटमुळे गंभीर अपघात किंवा दुखापत होऊ शकते .त्यामुळे बाजारात विकले जाणार आहे स्वस्तातले बनावट हेल्मेट घेणे टाळायला हवे .
- फक्त हेल्मेट घालणेच नाही तर हेल्मेट डोक्यावर व्यवस्थित बसणे त्याचा पट्टा योग्यरित्या बांधलेला असणे हे देखील महत्त्वाचे आहे .या नियमांचा मुख्य उद्देश रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करणे असा आहे .हेल्मेट घालण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या दुचाकी स्वरांवर वाहतूक पोलिस आता कडक कारवाई करणार आहेत .
हेही वाचा:
एकनाथ शिंदे मुळ दरेगावी दाखल, 3 दिवस असणार मुक्काम, अचानक गावी दाखल झाल्यानं चर्चांना उधाण
























