एक्स्प्लोर
धनंजय मुंडे म्हणतात, आम्हीही बीएमसीसी, रुपाली, वैशालीच्या कट्ट्यावर थांबायचो, पण...
मंत्री धनंजय मुंडे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार देखील मानले. तसेच पंकजा मुंडे यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
पुणे : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणींना देखील उजाळा दिला. आम्ही कॉलेजला असताना बीएमसीसीच्या, रुपाली, वैशालीच्या कट्ट्यावरही थांबायचो. (काही सेकंद थांबून) चहा प्यायला आणि वडापाव खायला दुसरा कोणताही अर्थ लावू नका, असे म्हणत मिश्किल संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी मला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांनी दिली नसती तर आज हा भाऊ तुम्हाला कुठंच दिसला नसता. 2014 साली मला कोणी चांगलं बोलत नव्हतं. गद्दार, घरफोड्या, पाटीत खंजीर खुपसला, धन्या, माझी लायकी, शिव्यांच्या राखोळ्या, खलनायक म्हणायचे. पण जसजसे लोक काम पहायला लागले. धन्याचा धनंजय झाला. धनंजयचा धनू भाऊ झाला आणि आता धनू भाऊंचा (असं म्हणताच जनतेतून आवाज मंत्री महोदय अशी घोषणा) मंत्री झालो. शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या मागे असते. हे मी पाहिलं. गेली सात वर्षे मी काय नाही पाहिलं. सर्व सहन केलं, दुःख कधीच व्यक्त नाही केलं. समाजसेवेचा वसा अण्णा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंकडून घेतला जो अजून सोडला नाही, असे मुंडे म्हणाले.
ते म्हणाले की, काही अनुभव असे आहेत. सोशल मीडियावर दीडशे शिव्या देणारा आज ह्याला-ना-त्याला पुढे करून कामं घेऊन येतोय. मला ही कळतंय हा रोज दीडशे शिव्या द्यायचा. पण मी मनात राग ठेवत नाही, त्यांचं ही काम करतोय. यालाच मनाचा मोठेपणा म्हणतात, असे ते म्हणाले. शेवटी स्वकर्तृत्वाने मिळालेलं कायम राहतं, अलगद मिळालेलं टिकत नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी आठवण सांगताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षाचे नेते होते. मोठा संघर्ष सुरू होता. माझी ही मित्र मंडळी ज्यांनी हे कॉलेज सुरू केलं, त्यापैकी 80 टक्के बारामती हॉस्टेलला. यांच्या प्रेमापोटी माझी मेस बारामती हॉस्टेलला. शेवटी नातं कुठून, कसं, काय जुळेल हे सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितलं.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची जबाबदारी मिळाली त्यात न्याय हा शब्द आहे तसाच न्याय देईल, असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; 'माझे पप्पा' भावनिक निबंध लिहिणाऱ्या चिमुकल्याला धनंजय मुंडेंचा मदतीचा हात
बजाज पीक विमा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश
कट्टर राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर
बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष मला हिणवले.. आता न्याय झाला : धनंजय मुंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नाशिक
बातम्या
क्राईम
Advertisement