Palghar Fire News : पालघऱ जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या. दुर्घटनेत वाहन चालकाचा जळून मृत्यू झाला आहे तर वाहक गंभीर जखमी झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या सोमटा इथं ही दुर्घटना घडली आहे. ट्रकसह ट्रक चालक जळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे .
समोरील वाहनाला धडक बसल्यानंतर ट्रकला भीषण आग
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, समोरील वाहनाला धडक बसल्यानंतर ट्रकला भीषण आग लागली होती. या आगीच ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या सोमटा इथं ही दुर्घटना घडली आहे.
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका हॉटेलला लागली भीषण आग, हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका हॉटेलला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधले पाच ते सहा सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. जळगाव व नशिराबाद येथील अग्निशामक दलाच्या बंबानी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीच्या घटनेत हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे महामार्गावरील हे हॉटेल आहे. अचानक आग लागल्याची घटना घडली, मात्र, शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पाच ते सहा सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला असून घटनेची माहिती मिळताच नशिराबाद व जळगाव येथील अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी हॉटेल चे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धुळे शहरात माथेफिरुने पेटवल्या दुचाकी
धुळे शहरातील संताजी नगर परिसरात होळीच्या रात्री एका माथेफिरूने घराबाहेर उभ्या असलेल्या तब्बल पाच दुचाकींना लाइटरच्या साह्याने आग लावून जाळून खाक केले आहे. अभय कॉलेज जवळील अगरबत्ती व्यावसायिक भरत चौधरी यांच्या घराबाहेर मध्यरात्री प्रकार घडला. ज्वलनशील पदार्थाच्या साहाय्याने लावण्यात आलेल्या या आगीत एक बुलेट, दोन ॲक्टिव्हा, एक स्प्लेंडर आणि एक स्कूटी पेप अशा पाच गाड्या जळून भस्मसात झाल्या असून, यात फिर्यादीचे सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या गंभीर घटनेप्रकरणी धुळ्याच्या चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली आहे. चाळीसगाव रोड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
महत्वाच्या बातम्या: