Horoscope Today 5 March 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 5 March 2026: आज गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 5 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 5 मार्च 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज मित्रमंडळींसाठी पैसा खर्च कराल, कुटुंबामध्ये तुमच्या शब्दाला किंमत राहील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमचा उत्साह तुमच्या कामांमध्ये सुधारणा करण्यास उपयोगी पडेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज सत्ता आणि मान मिळण्याच्या गोष्टींचे आकर्षण राहील. कोणत्याही क्षेत्रात काम करीत असला तरी कामाचा उरक चांगला राहील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज आर्थिक मान वाढेल, त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल, मर्दानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना उत्तम ग्रहमान
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिला जरा जास्तच मानी बनतील, स्वतः करीत असलेल्या कामांमध्ये नवीन संशोधन करून कौतुक मिळवाल
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज तरुण वर्ग आपला जोडीदार निवडण्यामध्ये यश मिळेल, नोकरी व्यवसायात लाभ होईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज साहित्य संगीत इत्यादी कलेशी जवळीक साधाल आणि त्याचा आनंद घ्याल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज सरकारी अडलेली कामे आवश्यक करा, नोकरीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी योजना आखाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज वारा पाहून पाठ फिरवल्यास फायद्याचे ठरेल, नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी येतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जास्त याल, अभ्यासू व्यक्ती तुमचा फायदा करून देईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये मोठ्या माणसांशी तुमची मते जुळणार नाही, त्यामुळे वाद होतील, व्यवसायात आर्थिक लाभ होतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महिला मानापमान जगतील, तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची तुमची पद्धत नावीन्यपूर्ण राहील.
हेही वाचा>>
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















