एक्स्प्लोर
Advertisement
बजाज पीक विमा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पीक विम्याचा प्रश्न बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मार्गी लावला आहे. सोबतच पीक विम्याची तकबाकी करणाऱ्या कंपनीवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड : जवळपास सात लाख शेतकऱ्यांचे विमा वाटप थकवलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी ओरिएंटल व बजाज या दोन्ही प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे 2018 चा थकीत पीकविमा वाटपास सुरुवात केली आहे. तर 90 हजार नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविम्याबाबत 27 तारखेपर्यंत लेखी याद्या देण्याचे निर्देशही मुंडे यांनी यावेळी दिले.
गेल्या अनेक दिवासांपासून पीक विम्याच्या थकबाकीचा प्रश्न प्रलंबित होता. याच पार्श्वभूमीवर प्रमुख पीक विमा कंपनी ओरिएंटल आणि बजाज यांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले होते.
बैठकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदारांमध्ये खडाजंगी -
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुरेश व आमदार प्रकाश सोळुंके यांच्यात वाद झाला. धस बोलत असताना सोळुंकेंनी त्यांना अडवल्याने धस संतापले अन टोकाची भाषा सुरू झाली वेळीच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला. या बैठकीत सुरेश धस यांनी एक मुद्दा मांडला त्यावर प्रकाश सोळंके यांनी मत व्यक्त केलं मात्र यावर सुरेश धस चांगलेच संतप्त झाले त्यांनी या बैठकीमध्ये राजकारण आणू नका तुम्ही नेहमी सदस्याचा अपमान करता. तुम्ही काही आमच्यापेक्षा ज्येष्ठ नाहीत. आपण सोबतच सुरुवात केली आहे तुम्ही आणि मी सोबतच जिल्हा परिषद सदस्य झालो आणि एकदाच आमदार झालो होतो फक्त तुम्ही श्रीमंतांच्या पोटी जन्माला आलात असे म्हणत प्रकाश सोळंके यांना सुरेश धसांनी सुनावले.
यावर साळुंके यांनी स्पष्टीकरण देताना मी कोणाचाही अपमान केला नाही, मी नियमाला धरून बोलत आहे, येथे कामाचा विषय बोला असे सांगितले. त्यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत धस यांना शांत केले. काय बोलायचे ते आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बोलू येथे वाद घालू नका असे सांगितले बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा वाद काही नवा नाही. मात्र सत्तेचे बदलेले बदललेली समीकरणे आणि कुरघोडीच्या राजकारणात बीडमध्ये राजकीय संघर्ष काही थांबताना दिसत नाही.
संबंधित बातम्या -
Beed | गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे-धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement