एक्स्प्लोर

Iran Israel War : चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही, इराणचा जगाला इशारा, डोनाल्ड ट्रम्प भडकले

Hormuz Strait Crisis : इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जागतिक तेलपुरवठ्यावर संकट निर्माण झालं आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी जहाजांना सुरक्षा देण्याचं जाहीर केलं आहे. 

Iran Israel War Update : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवत जागतिक व्यापाराला मोठा धक्का दिला आहे. इराणने या भागातील व्यापारी जहाजांना इशारा देत तेलपुरवठा खंडित केला आहे. चीन सोडून एकाही देशाच्या जहाजाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही असं इराणने स्पष्ट केलं आहे. तर कोणत्याही परिस्थितीत अमेरिका जगभरातील पुरवठा साखळी खंडित होऊ देणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. 

होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना तात्काळ विमा संरक्षण देण्याचे आदेश ट्रम्प यांनी United States International Development Finance Corporation (DFC) ला दिले आहेत. गरज भासल्यास अमेरिकन नौदल जहाजांना एस्कॉर्ट करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Hormuz Strait Crisis : इराणचे नियंत्रण, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची भीती

जगातील तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी सध्या इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या (Islamic Revolutionary Guard Corps) नियंत्रणाखाली असल्याचे सांगितलं जात आहे. सामुद्रधुनीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर इराणकडून ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक जलवाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा थेट परिणाम तेल आणि इंधन पुरवठ्यावर होऊ शकतो.

Indian Ships Stuck : 37 भारतीय जहाजे आणि हजारो खलाशी अडकले

युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुझ सामुद्रधुनीत 37 भारतीय जहाजे अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर कार्यरत एक हजारांहून अधिक भारतीय खलाशी सध्या या भागातच अडकले आहेत.

India Oil Reserve Update : भारताकडे 25 दिवसांचा साठा

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीच्या साठ्याबाबत भारतात तातडीची टंचाई नाही. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडे सुमारे 25 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. तरीही संभाव्य इंधनटंचाई टाळण्यासाठी भारत पर्यायी पर्यायांचा विचार करत आहे. रशियाकडून तेल खरेदीत वाढ करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती आहे.

Global Trade Protection : अमेरिकन नौदल सज्ज

अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांना आवश्यक ते संरक्षण दिले जाईल. सागरी व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी विमा संरक्षण आणि लष्करी मदत या दोन्ही उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून जागतिक ऊर्जा बाजाराचे लक्ष आता होर्मुझ सामुद्रधुनीकडे लागले आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Iran War LIve Update: असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
Bita Hemmati: बीता हेमातीबाबत इराणी न्यायाधीशांचा कठोर निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
बीता हेमातीबाबत इराणी न्यायाधीशांचा कठोर निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget