एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच ठाकरे गट बंडखोरीच्या तयारीत

Bhandara Assembly Constituency : भंडाऱ्यात काँग्रेसकडून पूजा ठवकर यांना उमेदवारी दिली असून मागील अनेक महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करणारे शिवसैनिक काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लढत होणार असून भंडारा विधानसभेत (Bhandara Vidhan Sabha Constituency) महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. कारण काँग्रेसला तिकीट गेल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक बंडखोरी करण्याच्या तयारीत असून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी एकाही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांबाबत प्रचंड रोष बघायला मिळत आहे. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिवसैनिकांच्या भरोशावर निवडून आले होते आणि नंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने भंडाऱ्याच्या जागेवर ठाकरे गटानं दावा सांगितला होता. विधानसभेची जागा हक्काची असल्यानं ती शिवसेनेला मिळेल, असं बोलल्या जात होतं. मात्र, भंडाऱ्याची जागा शिवसेनेला न देता काँग्रेसनं स्वतःकडं राखून घेतली. भंडाऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसकडून पूजा ठवकर यांना उमेदवारी दिली असून मागील अनेक महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करणारे शिवसैनिक काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

भंडारा विधानसभेत तिरंगी लढत?

त्यामुळे या विधानसभेत भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना नेते नरेंद्र पहाडे यांना तिकीट नं मिळाल्यानं आता ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. भंडारा विधानसभेत शिवसेनेची बंडखोरी करणार असल्यानं या निवडणुकीत शिंदे गटाचे शिवसेना उमेदवार विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेस उमेदवार पूजा ठवकर आणि शिवसेनेचे बंडखोर नरेंद्र पहाडे यांच्यात सामना होण्याची चित्र दिसू लागली आहे.

मी उमेदवारी दाखल करणार : नरेंद्र पहाडे 

याबाबत शिवसेना नेते नरेंद्र पहाडे म्हणाले की,  भंडारा-गोंदिया या जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी भंडाऱ्याची जागा ही हक्काची शिवसेनेची होती. मात्र, पक्ष नेतृत्व ही जागा स्वतःकडं ठेवण्यात कुठेतरी अपयशी ठरलंय. सात विधानसभेत एकही जागा शिवसेनेला नं मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्याने इथले शिवसैनिक आता कुणाकडे बघून शिवसेनेचा झेंडा हातात घेणार? शिवसैनिकांच्या विचारांचा शिवसेनेच्या वरिष्ठांनी कुठेही विचार केला नाही. कार्यकर्ता, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता मी माझी उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Devendra Bhuyar : अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला अन् आता अपक्ष लढण्याचा नारा? देवेंद्र भुयारांच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसने चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: 'मी दलित नाही बौद्ध आहे, आधी फरक समजून घ्या', भंडारा-गोंदियात हायव्होल्टेज ड्रामा, उमेदवारी माघारीवर दिलीप बनसोड यांचं भाजपवर पलटवार
भंडारा-गोंदियात हायव्होल्टेज ड्रामा! 'मी दलित नाही, बौद्ध आहे, आधी फरक समजा'; माघारीनंतर दिलीप बनसोडांचा भाजपवर पलटवार
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
Bunty Bhangdiya: 'काँग्रेसच्या चिन्हांवर निवडून आलेल्या काही नगरसेवकांची गद्दारी', विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप; बंटी भांगडियांचा पलटवर, म्हणाले, पुरावेही द्या
'काँग्रेसच्या चिन्हांवर निवडून आलेल्या काही नगरसेवकांची गद्दारी', विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप; बंटी भांगडियांचा पलटवर, म्हणाले, पुरावेही द्या
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका; काँग्रेसच्या चार नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका; काँग्रेसच्या चार नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
Embed widget