एक्स्प्लोर

Devendra Bhuyar : अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला अन् आता अपक्ष लढण्याचा नारा? देवेंद्र भुयारांच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसने चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Elections 2024 : अपक्ष आमदार म्हणून 5 वर्ष अजित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून देखील पहिल्या यादीत देवेंद्र भुयार यांचे नाव आलेले नाही.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मोर्शी विधानसभा मतदारसंघ (Morshi Assembly Constituency) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. कारण मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Ajit Pawar NCP) प्रवेश केला आहे. अजित पवार गटातून तिकीट मिळण्यासाठी देवेंद्र भुयार गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. 

आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. अजित पवार यांच्‍यामुळेच मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामे होऊ शकली, असे त्यांनी म्हटले आहे. राष्‍ट्रवादी अजित पवार गटाला मोर्शीची जागा मिळावी, यासाठी देवेंद्र भुयार यांनी प्रयत्न केले आहेत. गेल्‍या निवडणुकीत भुयार यांनी भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. मोर्शीची जागा भाजपला मिळावी, यासाठी डॉ. अनिल बोंडे हे आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीत अद्याप या जागेचा तिढा कायम आहे. 

देवेंद्र भूयारांच्या मनात नेमकं चाललंय काय?

अपक्ष आमदार म्हणून 5 वर्ष अजित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून देखील पहिल्या यादीत देवेंद्र भुयार यांचे नाव आलेले नाही. मागील 7 दिवसांपासून देवेंद्र भुयार मुंबईत पक्ष प्रवेश आणि एबी फॉर्म मिळेल या आशेने ठाण मांडून बसून होते. मात्र, त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. यानंतर देवेंद्र भुयार अखेर विधानसभा मतदार संघात निघून गेले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून संदेश दिला आहे. ते उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देवेंद्र भुयार यांना अद्याप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी मिळाला नसल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार का? अशी चर्चा आता रंगली आहे. तर देवेंद्र भूयारांच्या मनात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा

मुंबई महानगरपालिकेत 31 वर्षे नोकरी, ठाकरे गटाकडून विधानसभेचं तिकीट, पण राजू तडवींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget