एक्स्प्लोर

महिंद्राची कमाल! लॉन्च केली फक्त 60 किलो वजन असलेली इलेक्ट्रिक बाईक, मिळणार जबरदस्त रेंज आणि फीचर्स

EYSING PF40 Electric Bike: सध्या दुचाकींच्या बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा कल झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कंपन्या आपली वाहने इतर वाहनांपेक्षा वेगळी कशी दिसतील, यावर काम करताना दिसत आहे.

EYSING PF40 Electric Bike: सध्या दुचाकींच्या बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा कल झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कंपन्या आपली वाहने इतर वाहनांपेक्षा वेगळी कशी दिसतील, यावर काम करताना दिसत आहे. महिंद्राच्या मालकीची कंपनी Pininfarina ने असेच काहीसे केले आहे. कंपनीने रेट्रो लूक असलेली आपली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकचे नाव Pininfarina Eysing PF40 असे ठेवले. ही बाईक सध्या फक्त युरोपियन मार्केटमध्ये विकली जात आहे. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये कंपनीने कोणते फीचर्स दिले आहेत. तसेच या बाईकचे फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार घेऊ...

Pininfarina च्या या इलेक्ट्रिक बाईकला मोपेडसारखे डिझाइन देण्यात आले आहे. या बाईकमध्ये मोठी चाके लावण्यात आली आहेत. या बाईकच्या डिझाइनमध्ये फारच कमी फ्रेम वापरण्यात आली आहे. बाईकचा वरचा भाग इंधन टाकीसारखा आहे आणि बॅटरी खाली ठेवली आहे. ही बाईक दिसायला खूपच वेगळी आहे. 

EYSING PF40 Electric Bike: फक्त 60 किलो आहे वजन 

वजन कमी करण्यासाठी या बाईकच्या मधली जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. बाईकची बॅटरी थंड ठेवण्यासाठी हे चांगले वेंटिलेशन देखील प्रदान करते. या बाईकमध्ये अत्यंत कमी फ्रेम वापरल्यामुळे तिचे वजन फक्त 60 किलो आहे, ज्यात बॅटरीचाही समावेश आहे. ही इलेक्ट्रिक बाईक 45 किमी/तास वेगाने चालवता येते. युरोपमध्ये या वेगाच्या बाईकसाठी परवाना आवश्यक नाही.

Pininfarina Eysing Pf40 Electric Bike Range : किती आहे रेंज? 

Pininfarina इलेक्ट्रिक बाईक 1.72 kWh बॅटरी पॅकसह येते. यात 2 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर जास्तीत जास्त 100 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. याची बॅटरी नियमित चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरच्या मदतीने ती केवळ 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. ही बाईक एकाच राइडरसाठी आहे आणि जास्तीत जास्त 110 किलो वजन उचलू शकते.

Pininfarina Eysing Pf40 Electric Bike Price: किती आहे किंमत? 

Pininfarina Eysing Pf40 इलेक्ट्रिक बाईकची किंमत 7,070 युरोपासून सुरू होते. तसेच याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 13,780 युरोपर्यंत जाते. म्हणजेच भारतीय बाजारात याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12 लाख रुपये असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2025: मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02.00 PM TOP Headlines 02.00 PM 10 March 2025Maharashtra Budget Session 2025 | महायुतीचा बजेट मांडताना अजितदादांसमोर कोणती आव्हानं? ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 01.00 PM TOP Headlines 01.00 PM 10 March 2025Chhagan Bhujbal on Onion : कांदा प्रश्नावरून भुजबळ विधानसभेत आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांनी कांदाप्रश्न केंद्रांसमोर मांडावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2025: मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Crime News: रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
सोने-चांदीचे भाव पुन्हा कडाडले, होळीपूर्वीचा सोन्याचा दर किती?
सोने-चांदीचे भाव पुन्हा कडाडले, होळीपूर्वीचा सोन्याचा दर किती?
Beed Crime : खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
Nitesh Rane : मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट,  हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
Embed widget