एक्स्प्लोर

Udhhav Thackeray : 'ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता, त्याचं हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांच्या बांधावर या', उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Ahmednagar : उद्धव ठाकरे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोपरगाव, संगमनेर (Sangamner) आदी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या संवाद साधला.

नाशिक : 'कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्री चार-चार दिवस झोपत नाहीत आणि मग आराम करण्यासाठी गावाकडे हेलिकॉप्टरने जातात, मात्र मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की हेच हेलिकॉप्टर घेऊन जरा शेतकऱ्यांच्या बांधावरही फेरफटका मारून या, इथल्या साध्याभोळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या, असे आवाहनच उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी यावेळी केलं. 

आज उद्धव ठाकरे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोपरगाव, संगमनेर (Sangamner) आदी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या संवाद साधला. अनेक भागात पावसाअभावी पिके कोमेजली आहेत, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सगळ्यात शेतीच्या नुकसानीची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना करण्यात आली. या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. गावाकडच्या पंचतारांकित शेतीपेक्षा इथल्या मातीतल्या शेतीत एकदा भेट द्या, असं आवाहनच ठाकरे यांनी केले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, एकूणच महाराष्ट्र दुष्काळाच्या (Maharashtra Drought) उंबरठ्यावर आहे. आता काही भागात पाऊस पडत असला तरी हा पाऊस किती दिवस बरसणार आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. या पावसाने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल, पण दुबार पेरणी केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. अनेक पिकं करपून गेली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची भरपाई देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही, मग आता करपून गेलेल्या पिकांचे पंचनामे कधी होतील? नुकसान भरपाई कधी मिळेल? दरम्यान सरकारने एक रुपयात पिक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना सांगितले, मात्र पिकांचे पंचनामे कधी करणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

'तीन तिघाडा काम बिघाडा' सरकार

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सरकार नुसतं थापा मारत असून तिघाडा सरकार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 'तीन तिघाडा काम बिघाडा' असा सरकार असून स्वतःचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. जाहिराती जोरात करत आहेत. त्या जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हक्काचे पैसे सरकारने दिले पाहिजेत. पक्ष फोडायला यांच्याकडे पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी यांना पैसे नाहीत, हे महाराष्ट्रातील भीषण वास्तव आहे. आराम करायला हेलिकॉप्टरने शेतात जात आहेत, त्यांनी या शेतकऱ्याकडे यावं, इथली परिस्थिती बघावी, काही काळ आपण वाट बघू पण त्यानंतर सरकारला जाब विचारवाच लागेल. त्यानंतरही मी या भागात अनेक दौरे करणार आहे. सध्या काही भागात पाऊस सुरू आहे. हा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो अशी प्रार्थना साईचरणी करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

इतर महत्वाची बातमी : 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बांधावर, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन निघाले... 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget