एक्स्प्लोर
...'तर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करू', उद्धव ठाकरे घेतायत नगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश भागांचा आढावा
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश भागांची पाहणी करत आहेत.
Feature Photo
1/9

या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कोपरगाव तालुक्यातून केली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कातरी, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे, कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
2/9

मका आणि बाजरीच्या शेतात जाऊन ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
3/9

आज जरी पाऊस सुरू झाला असला तरी या पावसामुळे करपलेली पिकं वाचणार नाहीत, त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे सुरू करावे अशी मागणी ठाकरेंनी यावेळी केली.
4/9

पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
5/9

लवकरात लवकर शासन दरबारी न्याय मिळावा, दुष्काळ जाहीर होऊन मदत मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
6/9

दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शेती पिकांचे मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
7/9

शिवसेना नेहमी बळीराजासोबत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला
8/9

"कोणीही धीर सोडू नका, काळजी करू नका, काही दिवसांनी परत येतो," असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी देत निरोप घेतला.
9/9

उद्धव ठाकरे दौऱ्यावर असताना अचानक एका विद्यार्थ्याने ठाकरे यांना शिदोरी भेट दिली.
Published at : 08 Sep 2023 03:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























