Health Tips : तणावामुळे तुमची प्रोडक्टिव्हीटी कमी होऊ शकते; 'या' मार्गांनी स्ट्रेस मॅनेजमेंट करा
Stress Management : कोणतीही शारीरिक क्रिया केल्यानंतर, आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे आपले शरीर आणि मन शांत होते.
![Health Tips : तणावामुळे तुमची प्रोडक्टिव्हीटी कमी होऊ शकते; 'या' मार्गांनी स्ट्रेस मॅनेजमेंट करा Stress Management know how to control stress marathi news Health Tips : तणावामुळे तुमची प्रोडक्टिव्हीटी कमी होऊ शकते; 'या' मार्गांनी स्ट्रेस मॅनेजमेंट करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/14/36d6e3cfb1d8ec3583273a83adf465571705236987867358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Stress Management : अनेकदा आपण घरच्या आणि ऑफिसच्या कामात इतके व्यस्त असतो की आपल्याला स्वत:साठी वेळच मिळत नाही. अशा व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) अनेकदा पल्याला तणावाचा सामना करावा लागतो. तणाव आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतो. खरंतर, अति तणावामुळे आपल्या शरीरात कोर्टिसोलचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तुमची उत्पादकताही कमी होऊ शकते. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट (Stress Management) शिकणं फार गरजेचं आहे. अनेक छोट्या छोट्या उपक्रमांच्या मदतीने तुम्ही तणाव कमी करू शकता. स्ट्रेस मॅनेजमेंट करून तुम्ही कोणत्या मार्गांनी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो हे जाणून घेऊयात.
शारीरिक अॅक्टिव्हिटी करा
कोणतीही शारीरिक क्रिया केल्यानंतर, आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे आपले शरीर आणि मन शांत होते. वेगवान चालणे, धावणे, नृत्य करणे यांसारख्या अॅक्टिव्हिटी अशा वेळी फायदेशीर ठरू शकतात. यामुळे तणाव कमी करण्याबरोबरच इतर अनेक फायदे मिळू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
आपल्या छंदासाठी वेळ काढा
धकाधकीच्या दिवसानंतर तुमच्या आवडत्या छंदासाठी वेळ काढल्याने खूप आराम मिळतो आणि आणि फ्रेश वाटू लागते. वाचन, चित्र काढणे, गिटार वाजवणे यांसारख्या कोणत्याही कामासाठी थोडा वेळ काढा.
ध्येय निश्चित करा
अनेकदा कामामुळे आपण स्वतःवर जास्त दबाव टाकू लागतो, ज्यामुळे तणाव निर्माण होतो. जास्त काम करणे, कमी वेळेत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणे, ध्येय निश्चित न करणे इत्यादी कारणांमुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो. म्हणून, आपल्या कामासाठी ध्येय निश्चित करा. यामुळे तुमची ध्येय स्पष्ट राहतील आणि तुम्हाला खूप आराम वाटेल.
कुटुंब किंवा मित्रांबरोबर वेळ घालवा
तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि तुमच्या मित्रांबरोबर वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक आनंद मिळेल. त्यामुळे तुमचा काही वेळ तुमच्या मित्रांबरोबर घालवा.
पुरेशी झोप घ्या
कामामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कमी झोप घेणं तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन्सही वाढू लागतात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे दररोज भरपूर झोप घ्या.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : हिवाळ्यात वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)