Muskmelon Health Benefits : उन्हाळ्यात खरबूजाचा करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या अगणित फायदे
उन्हाळ्यामध्ये खरबूज या फळाचे सेवन करावे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते.
Muskmelon Health Benefits : उन्हाळ्यामध्ये डाएटकडे विशेष लक्ष द्यावे लागते. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश डाएटमध्ये करावा. टरबूज, खरबूज, काकडी यांचे सेवन उन्हाळ्यात करावे. यामधील खरबूजमध्ये अनेक अशी तत्वे असतात, ज्यामुळे शरीराला फायदा होतो. खरबूज या फळामध्ये 90 टक्के पाणी असते. ज्यामुळे भूक कमी लागते आणि शरीरामधील पाण्याचे प्रमाण वाढते. जाणून घेऊयात खरबूज खाल्ल्यानंतर होणार फायदे.
इम्युनिटी वाढेल
खरबूज या फळामध्ये विटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढते. त्यामुळे आठवड्यामधून दोन वेळा खरबूज खावे.
खरबूज या फळामध्ये फोलिक अॅसिडचे प्रमाण देखील जास्त आहे. ज्यामुळे नसांमध्ये रक्तांच्या गाठी होत नाहित. तसेच ह्रदयाच्या संबंधित जे आजार किंवा समस्या तुम्हाला जाणवत असतील त्या देखील खरबूज खाल्ल्यानं दूर होतात.
जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या जाणवत असेल तर तुम्ही खरबूज या फळाचा डाएटमध्ये समावेश करावा. कारण खरबूजमध्ये पाणी आणि ऑक्सिकाइनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीच्या संबंधित समस्या दूर होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care : चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी; होऊ शकतात गंभीर आजार
- Health Tips :वजन वाढेल, दातही खराब होतील! कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने पोहोचेल आरोग्याला हानी, जाणून घ्या..
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे