March Month Born Zodiac Personality : मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? वाचा लकी नंबर आणि स्वभाव वैशिष्ट्ये
March Month Born Zodiac Personality : ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्यात प्रामुख्याने मीन (Pisces) आणि मेष (Aries) या दोन राशींचा प्रभाव असतो.

March Month Born Zodiac Personality : हिंदू कॅलेंडरप्रमाणे, मार्च (March) हा वर्षाचा पहिला तिसरा आहे. या महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये काही विशेष गुण आणि वैशिष्ट्ये आढळतात. ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्यात प्रामुख्याने मीन (Pisces) आणि मेष (Aries) या दोन राशींचा प्रभाव असतो. या ठिकाणी डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी या संबंधित सविस्तर माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात.
मार्चमध्ये जन्म घेणारे कसे असतात?
मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि नशिबाचा कल हा सहसा मीन (Pisces) किंवा मे (Aries) राशीच्या प्रभावाखाली असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या जीवनातील विविध पैलू खालीलप्रमाणे असू शकतात:
स्वभाव (Nature)
संवेदनशील आणि दयाळू : ही मंडळी स्वभावाने खूप हळवी आणि इतरांच्या भावनांची कदर करणारी असतात. मदतीला धावून जाणे हा यांचा स्वभाव असतो.
शांत आणि अंतर्मुख : अनेकदा ही लोकं शांत राहायला पसंत करतात. ते स्वतःच्याच विचारांच्या जगात हरवलेले असतात.
सर्जनशील (Creative) : त्यांच्याकडे उपजत कल्पनाशक्ती उत्तम असते. कला, संगीत किंवा लेखनात त्यांची ओढ अधिक असते.
प्रामाणिक : हे लोक नातेसंबंधात आणि कामात खूप प्रामाणिक असतात, मात्र कधीकधी ते अतिशय भावूक होऊन चुकीचे निर्णय घेऊ शकतात.
वैवाहिक जीवन (Married Life)
समर्पित जोडीदार : आपल्या जोडीदारावर त्यांचे अतोनात प्रेम असते. ते कुटुंबाला प्राधान्य देतात.
रोमँटिक : त्यांचे वैवाहिक जीवन सहसा सुखी असते कारण ते नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
अपेक्षा : त्यांना आपल्या जोडीदाराकडूनही तितकीच भावनिक साथ हवी असते. कधीकधी त्यांच्या संशयी स्वभावामुळे किंवा अति-संवेदनशीलतेमुळे छोटे-मोठे वाद होऊ शकतात.
धन आणि आर्थिक स्थिती (Wealth)
चढ-उतार : आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांना पैशांसाठी संघर्ष करावा लागू शकतो, मात्र मध्यमवयानंतर त्यांची आर्थिक स्थिती चांगली सुधारते.
खर्चिक स्वभाव : इतरांना मदत करण्याच्या नादात किंवा आपल्या छंदांवर ते कधीकधी जास्त खर्च करतात. तरीही, त्यांच्याकडे पैशांची कमतरता सहसा भासत नाही.
आरोग्य (Health)
मानसिक आरोग्य : अतिविचार करण्याच्या सवयीमुळे त्यांना मानसिक ताण किंवा निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
त्वचा आणि पोट : त्यांना पोटाचे विकार किंवा त्वचेच्या समस्या जाणवण्याची शक्यता असते.
सावधगिरी : त्यांनी आहार आणि व्यायामावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते, विशेषतः पाणी भरपूर पिणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.
नोकरी आणि करिअर (Career)
क्षेत्र : ही लोकं शिक्षण, कला, समुपदेशन (Counseling), नर्सिंग, पर्यटन किंवा धार्मिक क्षेत्रात चांगली प्रगती करतात.
नेतृत्व : ते उत्तम कर्मचारी असतात, पण जेव्हा त्यांना मोकळीक मिळते तेव्हा ते उत्तम नेतृत्वही करू शकतात.
जिद्द : एकदा एखादे काम हातात घेतले की ते पूर्ण करण्याची त्यांची जिद्द असते, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांना मान-सन्मान मिळतो.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Numerology : प्रेमात पडतात पटकन, पण लग्न करताना बदलतो निर्णय; 'या' जन्मतारखेचे लोक असतात 'Unpredictable', विश्वास ठेवाल तर...



















