एक्स्प्लोर

Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Health Care: सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होतं. याचाच मोठा परिणाम आपल्या शरीरावर होतो.

Health Care: सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होतं. याचाच मोठा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशातच संसर्ग आणि असंसर्गजन्य आजार (NCDs) रोखण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. भारतात असंसर्गजन्य आजार अत्यंत तीव्र गतीने वाढत आहे. आपल्या देशात कार्डिओव्हॅस्क्युलर आजार, कर्करोग, श्वसनाचे आजार आणि मधुमेह आजार खूप तीव्र गतीने वाढत आहे. या आजारांमुळे मागील तीन दशकांत मृत्यूदर 83 टक्क्यांनी वाढला आहे. भारतात 26 ते 59 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार सर्वात जास्त आढतो, असे असोकेमच्या (2021) अहवालात सांगण्यात आले आहे. यातील मधुमेह आणि हायपरटेन्शन हे प्रामुख्याने ताणाशी संबंधित आजार असून भारतात याचे अनुक्रमे 2.9 टक्के आणि 3.6 टक्के रुग्ण आहेत.

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार यांसोबतच स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. देशात मोठ्या प्रमाणात असे लोक आहेत, ज्यांना योग्य आहार मिळत नाही, असं या अहवालात सांगण्यात आले आहे. यामुळेच देशात कुपोषणाचे प्रमाण देखील वाढले असल्याचे या आवाहला सांगण्यात आले आहे. हे आजार टाळण्यासाठी किंवा यापासून बचावासाठी व्हिटॅमिन सी हे खूप मत्वाचे आहे. व्हिटॅमिन सी  हे नैसर्गिकरित्या आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. 

याबाबतच माहिती देताना लीलावती रुग्णालयातील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी म्हणाले आहेत की, ''व्हिटॅमिन सी हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या सामान्य एनसीडी असलेल्या रुग्णांना इतरांपेक्षा जास्त जीवनसत्त्वे आवश्यक असू शकतात. व्यक्ती व्हिटॅमिन सी पूरक आहाराद्वारे आपल्या नियमित पोषण इनटेक वाढवू शकतात. यासाठी लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटोंसह समृद्ध, संतुलित आहाराचेही सेवन करू शकतात.'' यावरच बोलताना ग्लोबल मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. पराग शेठ म्हणाले की, “व्हिटॅमिन सी मधून विविध प्रकारचे आरोग्याचे फायदे मिळतात. जसे प्रतिकारशक्ती आणि अँटीऑक्सिडंटच्या पातळी वाढवणे.''

देशातील नागरिकांमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता

देशभरातील नागरिकांमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता दिसून आली आहे. देशातील उत्तर आणि दक्षिण भारतात अनुक्रमे सुमारे 74 टक्के आणि 46 टक्के कमतरता आढळली आहे. ही कमतरता प्रामुख्याने असंसर्गजन्य आजारने ग्रस्त लोकांमध्ये अधिक दिसून आली आहे. यामुळे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेसाठी सामान्य धोक्याच्या घटकांमध्ये वाढलेले वय (विशेषतः गॅरिएट्रिक लोकसंख्या), कुपोषण, प्रदूषण किंवा धूर, बायोमास इंधने यांच्या संपर्कात येणे, तंबाखूचे सेवन या गोष्टी कारण ठरतात. भारतीयांमध्ये या बाबी आढळून येतात.

व्हिटॅमिन सी समृध्द आहेत हे खाद्यपदार्थ

जेव्हा शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता होते, तेव्हा तुम्ही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने त्याची कमतरता भरून काढू शकता. यासाठी लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करावा. फळांमध्ये संत्री ही व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानली जाते. संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. हृदय आणि डोळ्यांसाठीही हे फायदेशीर आहे. सीझनमध्ये तुम्ही पेरूही खाऊ शकता. पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. उन्हाळ्यात आंब्याला तुमच्या आहाराचा भाग बनवा. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. याशिवाय आंब्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्वही आढळते. सर्व ऋतूंमध्ये आढळणारी पपई ही व्हिटॅमिन सीचा नैसर्गिक स्रोत आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. अननस खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात. स्ट्रॉबेरी आणि किवीमध्येही व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. याशिवाय इतरही अनेक आवश्यक पोषक घटक त्यात आढळतात जे तुम्हाला निरोगी ठेवतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget