AHealth Care Tips : डोळ्यांची निगा राखणं महत्वाचं ; अशी करा स्वच्छता
Eyes : डोळे स्वच्छ करण्यासाठी या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

Eyes : डोळे हा चेहऱ्याचा नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. डोळ्यांची स्वच्छता ठेवण्यासाठी काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्ही डोळे स्वच्छ ठेवले नाही तर तुम्हाला चष्मा लागण्याची शक्यता असू शकते. काही लोक त्यांचे डोळे नॉर्मल पाण्याचा वापर करून स्वच्छ करतात. पण आयुर्वेदानुसार, डोळे स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. जर तुमचे डोळे हे सेन्सेटिव्ह असतील तर तुम्ही 'या' टिप्स फॉलो करू शकता-
डोळे स्वच्छ करण्यासाठी लागणारे साहित्य-
दोन ते तीन चमचे त्रिपळा चूर्ण आणि फिल्टर केलेले स्वच्छ पाणी
त्रिफळा चुर्ण उकळलेल्या पाण्यामध्ये टाका हे पाणी रात्रभर झाकूबन ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यामध्ये स्वच्छ कापड भिजवा. नंतर ते कापड डोळ्यांवरून फिरवा. तुमच्या डोळ्यांमधील धूळ तसेच डोळ्यांची सूज असं केल्यानं कमी होईल.
डोळ्यांची स्वच्छता करण्याचे फायदे-
आठवड्यातून दोन वेळा जर तुम्ही डोळ्यांची स्वच्छता केली तर डोळे हेल्दी राहतात. तसेच डोळ्यांची सूज आणि थकवा दूर होतो. डार्क सर्कल्स देखील कमील होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
- Maha Shivratri 2022 : 'हर हर महादेव' ; जाणून घ्या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha






















