एक्स्प्लोर

Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?

Weight Loss Tips:  वजन कमी करण्यासाठी गव्हाची चपाती खावी की, मल्टीग्रेन रोटी खावी? यापैकी कोणती जास्त फायदेशीर ठरेल, असा विचार अनेकांच्या मनात येतो.

Weight Loss Tips: बहुतेक लोक वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी डायटिंग करतात, म्हणजेच खाणेपिणे कमी करतात. वजन कमी करण्याच्या नादात अनेकजण चपाती खाणेही सोडून देतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी हा पर्याय अतिशय चुकीचा आहे. असे केल्याने तुम्हाला लवकर थकवा जाणवू शकतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही चपातीही खाऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला योग्य पीठ निवडावे लागेल.

आता वजन कमी करण्यासाठी गव्हाची चपाती खावी की, मल्टीग्रेन रोटी खावी? यापैकी कोणती जास्त फायदेशीर ठरेल, असा विचार अनेकांच्या मनात येतो. तुम्ही देखील याच संभ्रमात असाल, तर जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला या दोन्ही पिठांमधील फरक सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

मल्टीग्रेन रोटी (Multi Grain)

मल्टीग्रेन रोटी म्हणजे एक अशी चपाती, जी अनेक प्रकारच्या धान्यांनी बनलेली असते. त्यात ओट्स, गहू, बाजरी, कॉर्न, ज्वारी, हरभरा इत्याही तृणधान्यांपैकी 3 ते 5 प्रकारचे धान्य समाविष्ट केलेले असते. यापेक्षा अधिक धान्याचे पीठ देखील बाजारात उपलब्ध आहे. मल्टीग्रेन पिठात जास्त फायबर असते, जे वजन कमी करणाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरते.

मल्टीग्रेन रोटीचे फायदे :

* मल्टीग्रेन पिठापासून बनवलेल्या रोट्या खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात. गव्हाच्या पिठात जर सोयाबीन, हरभरा आणि बार्ली मिसळले, तर ती चपाती प्रथिनांचा चांगला स्रोत बनते. मुलांच्या विकासातही याचा फायदा होतो.

* मल्टीग्रेन पिठाच्या चपात्या खाल्ल्याने पचनसंस्थाही व्यवस्थित राहते.

गव्हाची चपाती (Wheat)

गव्हाचे पीठ फक्त संपूर्ण गहू दळून तयार केले जाते. यातील कोंड्यामुळे पिठाची पौष्टिकता वाढते. गव्हात व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, फायबर्स आणि मिनरल्स असतात.  

गव्हाची चपाती खाण्याचे फायदे :

* गव्हाची चपाती मधुमेही, हृदयरोगींसाठी फायदेशीर आहेत.

* गव्हाची चपाती नियमित खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो.

गव्हाची चपाती की मल्टीग्रेन रोटी?

ही दोन्ही पीठं समप्रमाणात पौष्टिक आहेत. मात्र, केवळ वजन कमी करण्यासाठी मल्टीग्रेन रोटी गव्हाच्या चपातीच्या तुलनेत लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरली असती. म्हणूनच वजन कामी करायचे असेल, तर तुम्ही मल्टीग्रेन चपातीचे सेवन करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Embed widget