Maha Shivratri 2022 : 'हर हर महादेव' ; जाणून घ्या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
Mahashivratri 2022 : यावर्षी महाशिवरात्री ही रविवारी (1 मार्च) साजरी केली जाणार आहे.
Mahashivratri 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीला उपास आणि शंकराची पूजा केली जाते. शंकराचे भक्त हे रात्रभर जागून शंकराची पूजा करतात. तसेच काही लोक ज्योतिर्लिंग तीर्थ यात्रेला देखील जातात. यावर्षी महाशिवरात्री ही उद्या म्हणजेच रविवारी (1 मार्च) साजरी केली जाणार आहे. जाणून घेऊयात महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि पूजेचा विधी
शुभ मुहूर्त
यावर्षी महाशिवरात्री ही एक मार्च रोजी मंगळवारी पहाटे 3.16 वाजता सुरू होईल. शिवरात्रीची तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्दशी तिथी बुधवार, 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता समाप्त होईल.
पूजा विधी
पूजा करताना शंकराला दूध, गुलाबजल, चंदन , दही, मध, तूप, साखर आणि पाणी अर्पण करा. शिवलिंगावर बेलाच्या पानांची माळ अर्पण करा आणि नंतर चंदन किंवा कुमकुम लावा. आरती करा. पूजा झाल्यानंतर ध्यान करा. तसेच शंकराच्या मंत्रांचे पठण करा.
असा करा उपास
महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी केवळ एक वेळा जेवण करा. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांनी उपास करायचा संकल्प करावा आणि हा संकल्प यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी देवाचा आशीर्वाद घ्यावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
- Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha