एक्स्प्लोर

Health Tips : कमी वयातच केस पांढरे होत आहेत का? असं का होतं? यावर उपाय काय...

Health Tips  :   केवळ वयस्कर लोकांनाच नाही तर अनेक तरुणांनाही केस पांढरे होण्याची समस्या उद्भवतेय. तणावामुळे अनेकांना तर कमी वयातच या समस्यांचा सामना करावा लागतो. 

Health Tips  :  अनेकांना कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या होत आहे. केवळ वयस्कर लोकांनाच नाही तर अनेक तरुणांनाही ही समस्या उद्भवतेय.  कामाचा व्याप आणि त्यामुळे वाढणारा तणाव हे यामागील सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. तणावामुळे अनेकांना तर कमी वयातच या समस्यांचा सामना करावा लागतो. 

ढणारा तणाव सर्वात मोठं कारण केस पांढरे होण्याचं सर्वात मोठं कारण वाढणारा तणाव आहे. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. सतत विचार केल्यामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो. याच कारणामुळे कमी वयातच लोकांना केस पांढरे होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी शक्यतो स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तणावामुळे किंवा डिप्रेशनमुळे पांढऱ्या केसांसोबतच इतरही आजारांचा सामना करावा लागतो. 

व्हिटॅमिन्सची कमतरता आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स शरीरासोबतच केसांचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतात. काही मेडिकल जर्नल्समध्ये यावर रिसर्च करण्यात आलेला आहे आणि त्याच आधारावर असं सांगण्यात येतं की, सुंदर केसांसाठी व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ईची आवश्यकता असते. 

सध्याच्या फॅशन युगात खासकरून तरूण-तरूणींना केसांना तेल लावायला अजिबात आवडत नाही. परंतु, केसांचं आरोग्य राखण्यासाठी आणि त्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी केसांना तेल लावणं आवश्यक असतं. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात तेल लावत नसाल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावून झोपू शकता. 

आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावून मालिश करा. यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि त्यांचं सौंदर्य टिकवण्यासही मदत होते. झोपेची कमतरता कमी झोप घेतल्यामुळे केसांच्या वाढिवर त्याचा परिणाम होतो आणि केस गळण्यास सुरुवात होते. तुम्हाला जर चांगले आणि सुंदर केल पाहिजे असतील तर पुरेशी झोपं घेणं गरजेचं असतं. कमी झोप घेणं हे तणावाचंही कारण ठरू शकतं आणि आधी सांगितल्यानुसार, तणावामुळे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढते. 

अनेकदा अनुवंशिक कारणांमुळेही केसांवर परिणाम होतो आणि कमी वयातच केस पांढरे होतात. जर तुमच्या परिवारातील कोणाचे केस वेळेआधीच पांढरे झाले असतील किंवा केस गळत असतील तर तुमचेही केस पांढरे होऊ शकतात. केस पांढरे होण्यासाठी जर अनुवंशिक कारणं असतील तर यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते. तसेच आहारातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा लागेल. 

अनेकदा कमी वयात केस पांढरे होण्यासाठी धुम्रपान आणि मद्यसेवन या गोष्टी कारणीभूत ठरतात. केमिकलयुक्त उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर अनेकदा आपण जाहिरातींना बळी पडून केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करतो. या परिणामांमुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो आणि केसांचा रंगही पांढरा होतो. त्यामुळे केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करणं शक्यतो टाळा.  

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Sunil Kedar: सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Embed widget