एक्स्प्लोर

Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'

Bollywood Actress on Khamenei Death: जॉन अब्राहमसोबत 'तेहरान' सिनेमात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजीनं धाडस करत अगदी उघडपणे सांगितलं की, इराणमध्ये सत्ता परिवर्तनाची खरंच गरज आहे.

Bollywood Actress on Khamenei Death: इराण (Iran War), इस्त्रायल (Israel) आणि अमेरिका (America) यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्त्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी (Iran Supreme Leader Ayatollah Khamenei) यांची हत्या झाली. त्यानंतर इराणमधील एका मुलींच्या शाळेला लक्ष्य करण्यात आलं, यामध्ये अनेक शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं अख्खं जग हळहळलं आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर जगभरात खळबळ माजली. भारतातही याचे पडसाद पाहायला मिळाले. भारतातील अनेक भागांत खामेनी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यात आला. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीनं मात्र खामेनींच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करत देवाला धन्यवाद म्हटलं आहे. 

जॉन अब्राहमसोबत (John Abraham) 'तेहरान' सिनेमात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजीनं (Elnaaz Norouzi) धाडस करत अगदी उघडपणे सांगितलं की, इराणमध्ये सत्ता परिवर्तनाची खरंच गरज आहे. तसेच, सध्याचे सत्ताधारी कॅन्सरसारखे आहेत, असंही ती म्हणाली. अशातच आता इराणमध्ये सत्तांतर झालं असून खामेनी यांचा मुलगा मोज्तबा खमेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. आता मात्र, मूळची इराणी असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीनं संताप व्यक्त केला आहे. 

इराणमध्ये सत्तांतरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. अशातच खामेनी यांच्या मृत्यूनंतर आनंद साजरा करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीनं मात्र, आता संताप व्यक्त केला आहे. 

इराणी वंशाची बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी हिनं इराणमधल्या सत्तांतरावर प्रश्न उपस्थित केला आहे. नेटफ्लिक्सवरची गाजलेली सीरिज सेक्रेड गेम्सद्वारे ओळख मिळविलेली एलनाज नौरोजी म्हणाली की, इराणमधील नेते लोकांद्वारे निवडले जात नाहीत. गेल्या 47 वर्षांपासून लोकांचा आवाज दाबला जातोय आणि सामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार खऱ्या अर्थानं मिळालेला नाही, असा दावा तिनं केला आहे.

कुटुंब हरवलंय, देश ब्लॅकआउटमध्ये 

सध्याच्या परिस्थितीमुळे ती तिच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकत नसल्याचं एलनाज नौरोजीनं स्पष्ट केलंय. इराणमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आला आहे. तिनं सांगितलं की, लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अलिकडच्या अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. एलनाजच्या मते, इराणमधील अस्थिरता ही काही नवी गोष्ट नाही. तिनं सांगितलं की, निदर्शनांच्या वेळी लोकांना अधिक असुरक्षित वाटतं, कारण या काळात सरकार कठोर कारवाई करतं.

"जनतेला नाही मिळत स्वतःचा नेता निवडण्याचा हक्क..."

नवा सर्वोच्च नेत्याच्या निवडीच्या मुद्द्यावर एलनाजनं म्हटलंय की, हा निर्णय जनतेच्या पसंतीवर आधारित नव्हता. त्यांनी सांगितलं की, ही परिस्थिती 47 वर्षांपासून कायम आहे. 2009 च्या प्रचंड निदर्शनांचा संदर्भ देतोय, ती म्हणाली की, लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि घोषणा देत होते, "आमचं मत कुठे आहे?" एलनाजचा आरोप आहे की, अनेक लोकांचे प्राण गेले, पण व्यवस्था तशीच राहिली. इराणच्या लोकांना फक्त त्यांचा नेता निवडण्याचा अधिकार हवा आहे.

"खंबीर राहा, चांगल्या दिवसांची आशा करा..."

अभिनेत्री एलनाजनं जगभरात राहणाऱ्या इराणी लोकांना इमोशनल मेसेजही दिला आहे. त्यांनी सांगितलं की, लाखो इराणी लोक देश सोडून अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहेत, कारण त्यांना त्यांच्या मायदेशात सुरक्षित आणि सन्माननीय जीवन मिळत नाही. त्यांनी लोकांना खंबीर राहण्याचे आणि चांगल्या दिवसांची आशा करण्याचं आवाहन केलंय. एलनाज म्हणाली की, 90 मिलियन लोकांना देश सोडण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही, म्हणून बदल आतूनच आला पाहिजे.

"ते मला मारुन टाकतील..."

इराणमध्ये जन्मलेली एलनाज लहानपणीच तिच्या कुटुंबासह परदेशात गेली. तिचं कुटुंब जर्मनीला गेलं, तेव्हा ती फक्त आठ वर्षांची होती. सुमारे 20 वर्षांच्या वयात ती भारतात परतली आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावलं. एलनाजनं खुलासा केला की, ती दहा वर्षांहून अधिक काळ इराणला गेली नाही आणि आता तिला परत येणं शक्य नाही. ती म्हणाली, "मी इराणला परत जाऊ शकत नाही. जर मी तिथे गेले तर मला वाटतं की, माझ्या जीवाला धोका आहे... ते मला मारतील..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Elnaaz Norouzi Happy On Ayatollah Khomeini Death: खामेनींच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा; VIDEO शेअर करत म्हणाली, 'देव खूप महान...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Galgunde Matka King Web Series: 'सैराट' फेम लंगड्या पुन्हा एकदा नागराज मंजुळेंसोबत; 'मटका किंग'मध्ये तानाजी गालगुंडे महत्त्वाच्या भूमिकेत
'सैराट' फेम लंगड्या पुन्हा एकदा नागराज मंजुळेंसोबत; 'मटका किंग'मध्ये तानाजी गालगुंडे महत्त्वाच्या भूमिकेत
Raja Shivaji Movie Trailer: रितेश-जिनेलियाच्या धाकट्या लेकाचं इंडस्ट्रीत दणक्यात पदार्पण; 'राजा शिवाजी'मध्ये साकारणार दमदार भूमिका
रितेश-जिनेलियाच्या धाकट्या लेकाचं इंडस्ट्रीत दणक्यात पदार्पण; 'राजा शिवाजी'मध्ये साकारणार दमदार भूमिका
Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Embed widget