एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या घातपाताचा संशय, देवगिरी बंगल्यावर रात्री 20 आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार 28 जानेवारीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला येत असताना त्यांचे विमान कोसळले होते. या विमानचा स्फोट झाला होता.

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर या संपूर्ण घटनेभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्हीएसआर कंपनी, नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) यांच्यावर गंभीर आरोप केले असून अजितदादांच्या अपघातामागे (Ajit Pawar Plane Crash) घातपात असल्याचा संशय वारंवार बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात एक महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार काल रात्री देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना भेटायला गेले होते. या भेटीत सुनेत्रा पवार आणि या आमदारांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या सुरु असलेल्या या हालचालींची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी बुधवारी रात्री मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या संबंधित आमदारांनी डीजीसीएने अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सादर केलेल्या अहवालाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या. सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या विमान अपघाताची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून चौकशी व्हावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीचे काय झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करावी, असे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यावर सुनेत्रा पवार यांनी आपण लवकरच सगळे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सांगितल्याचे समजते. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांनी  डीजीसीएने अजित पवारांच्या विमान  अपघाताबाबत सादर केलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे सुनेत्रा पवार यांना सांगितले. या अहवालाबाबत अनेक प्रश्न आणि शंका या आमदारांनी कालच्या बैठकीत उपस्थित केल्या. सुनेत्रा पवार यांनी देवगिरीवर आलेल्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याचेही समजते. या स्वतंत्र भेटीत आमदारांनी सुनेत्रा पवार यांना नेमकं काय-काय सांगितलं, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. 

 मात्र, सुनेत्रा पवार यांनी कालच्या बैठकीवेळी देवगिरी बंगल्यावर आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू सगळ्यांना दाखवल्या. यामध्ये अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळाचा समावेश आहे. त्या अनुषंगानेही सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे देवगिरी बंगल्यावरील सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.

आणखी वाचा

पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर, थेट उपमहापौरांच्या विरोधताच जोडे मारो आंदोलन
साताऱ्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर, थेट उपमहापौरांच्या विरोधताच जोडे मारो आंदोलन
Rohini Khadse : शरद पवारांना बाप म्हणून पोळी भाजली, आमदारकीच्या तुकड्यासाठी पक्ष सोडणाऱ्यांनी बोलू नये; रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका
शरद पवारांना बाप म्हणून पोळी भाजली, आमदारकीच्या तुकड्यासाठी पक्ष सोडणाऱ्यांनी बोलू नये; रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Embed widget