एक्स्प्लोर

Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!

इराणने अवघ्या 33 किमीची पण जगासाठी लाईफलाईन असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने खनिज वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Putin on Gas to European Markets: इस्त्रायल अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगाची ऊर्जा क्षेत्रामध्ये चांगलीच कोंडी झाली आहे. इराणने अवघ्या 33 किमीची पण जगासाठी लाईफलाईन असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने  खनिज वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका चीन सोडून अन्य राष्ट्रांना बसणार आहे. कारण तशी धमकीच इराणकडून देण्यात आली आहे. चीनसोडून जर कोणी या मार्गातून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही उद्ध्वस्त करू असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतासह पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस आयातीवर अवलंबून असलेल्यांना मोठा झटका बसण्यास सुरुवात झाली आहे. 

युरोपची कोंडी करण्याचं ठरवलं आहे का?

युरोपियन राष्ट्रांची इराणविरुद्धच्या युद्धात कोंडी झाली असतानाच जाता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आता युरोपची कोंडी करण्याचं ठरवलं आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे युद्ध कधी संपणार अशा चर्चा अनेक राष्ट्रांमध्ये होत असताना युरोपला गॅस पुरवठा करण्यासंदर्भात पुतीन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युरोपियन बाजारपेठेला गॅस पुरवठा थांबून नवीन बाजारपेठेमध्ये स्वतःला प्रस्थापित करणे आमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकेल, असे पुतीन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युरोपसाठी नवी डोकेदुखी ठरणार का? रशियाचा गॅस युरोपला होणारा गॅसपुरवठा  मोठ्या प्रमाणात घसरला असला तरीही एकूण गॅस आयातीमध्ये 13 टक्के वाटा अजूनही आहे. त्यामुळे जर रशियाने हा निर्णय अंतिम केला तर युरोपच्या अडचणी वाढू शकतात. 

युरोपचा गॅस पुरवठा थांबवण्याचे संकेत 

पुतीन यांनी रशिया युरोपियन बाजारपेठेला होणारा गॅस पुरवठा आता थांबवू शकतो आणि त्याऐवजी इतर अधिक आशादायक व फायदेशीर बाजारपेठांकडे वळू शकतो, असे म्हटलं आहे. रशियन सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पुतीन म्हणाले की, आता इतर बाजारपेठा खुल्या होत आहेत. त्यामुळे आत्ताच युरोपियन बाजारपेठेला गॅस पुरवठा थांबवणे आणि नवीन बाजारपेठांमध्ये जाऊन स्वतःला प्रस्थापित करणे आमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकेल. पुतीन यांनी हेही स्पष्ट केले की, हा अद्याप कोणताही अंतिम निर्णय नाही, तर हा केवळ 'मोठ्याने केलेला विचार' आहे. मात्र, त्यांनी सरकार आणि रशियन कंपन्यांना या विषयावर एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना नक्कीच देणार असल्याचे सांगितले आहे.

युरोपियन युनियनचा तेलावरील बंदीचा निर्णय

हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा युरोपियन कमिशन 15 एप्रिल रोजी (हंगेरीच्या निवडणुकांनंतर) रशियन तेलाच्या आयातीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा कायदेशीर प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे. 2022 च्या युक्रेन युद्धानंतर रशियाकडून युरोपला जाणारा इंधन पुरवठा मोठ्या प्रमाणावर घटला आहे. तरीही रशिया अद्यापही सर्बिया, हंगेरी आणि स्लोव्हाकिया या युरोपीय देशांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवतो. याशिवाय 'नोवाटेक'च्या नेतृत्वाखालील यामल एलएनजी (Yamal LNG) प्लांटमधूनही इंधन पुरवले जाते. रशिया हा नेहमीच एक 'विश्वसनीय ऊर्जा पुरवठादार' राहिला आहे आणि जे देश स्वतः विश्वासू भागीदार आहेत (उदा. स्लोव्हाकिया आणि हंगेरी), त्यांच्यासोबत रशिया यापुढेही नेहमीप्रमाणे व्यापार सुरूच ठेवेल, असा पुनरुच्चार पुतीन यांनी केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Nepal Politics: देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget