एक्स्प्लोर

Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....

Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल एकता सावंत नुकतीच राज ठाकरे यांच्या भेटीला गेली होती. तिने राज ठाकरेंसोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Shawarma Girl meets Raj Thackeray: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली डोंबिवलीची शोरमा गर्ल एकता सावंत हिने नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. शोरमा गर्ल (Shawarma Girl) नावाने इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असणाऱ्या एकता सावंत हिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती डोंबिवलीत रस्त्यावर शोरमाचा स्टॉल लावायची. मात्र, या स्टॉलवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अनेकदा कारवाई केली होती. यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) हे शोरमा गर्लच्या मदतीला धावून आले होते. त्यांनी राज ठाकरे यांचा फोटो असलेला स्टॉल एकता सावंत (Ekta Sawant) हिला दिला होता. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एकता सावंत हिची लोकप्रियता आणखीनच वाढली होती. (Dombivli News)

मनसेने केलेल्या मदतीमुळे एकता सावंत हिचा शोरमाचा व्यवसाय पुन्हा सुरु झाला होत्या. त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानायला एकता सावंत नुकतीच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेली होती. राज ठाकरे यांना भेटल्यानंतर एकता सावंत हिने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पाया पडली. शोरमा गर्लने राज ठाकरे यांना भेट म्हणून एक घड्याळ आणले होते. घड्याळाची पिशवी तिने राज ठाकरे यांच्या हातात ठेवली तेव्हा त्यांनी यामध्ये काय आहे, असे एकता सावंतला विचारले. त्यावर तिने घड्याळ असे उत्तर दिले. तेव्हा राज ठाकरे यांनी 'मला घड्याळ नको, तू मला मस्तपैकी शोरमा घेऊन ये', असे सांगत हे घड्याळ एकता सावंतला परत दिले. यानंतर एकता सावंत हिने शर्मिला ठाकरे यांचीही भेट घेतली. 

शोरमा गर्ल एकता सावंत ही डोंबिवलीत व्यवसाय करते. येथील रस्त्यावर तिचा शोरमा स्टॉल आहे. मात्र, पालिकेचे काही अधिकारी जाणीपूर्वक आपल्या स्टॉलवर कारवाई करतात, इतर फेरीवाल्यांना पैसे घेऊन सोडून देतात, असा आरोप एकता सावंत हिने केला होता. तिचा हा व्हिडीओ पाहून मनसेचे अविनाश जाधव स्वत: डोंबिवलीत गेले होते. त्यांनी एकता सावंत हिला राज ठाकरे यांचा फोटो असलेला शोरमा स्टॉल दिला होता.

दरम्यान, एकता सावंत हिने या भेटीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तिने, 'लढत राहिले… काम करत राहिले… आणि आज राज ठाकरे साहेबांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस ठरलं', असे कॅप्शन लिहले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ekta sawant (@sawant_shawarma)

आणखी वाचा

डोंबिवलीतील शॉरमा विक्रेत्या तरुणीचा पत्रकारांशी संवाद; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज, व्हिडिओ व्हायरल

डोंबिवलीत शोरमा विकणाऱ्या मराठी तरुणीचा स्टॉल पालिकेने हटवला, रील पाहून अविनाश जाधव मार्केटमध्ये पोहोचले अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
Ratnagiri Bauxite Mining Project: बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
Vijay Wadettiwar on Navneet Rana: 'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Embed widget