Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Pune News: पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठाच्या आवारात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गेल्या 15 दिवसांपासून एका तरुणीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले.

Pune Crime News: पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठाच्या आवारात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गेल्या 15 दिवसांपासून एका तरुणीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाल्याचा प्रकार समोर आला. संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावत चोप दिल्याचे पाहायला मिळाले.
Pune Crime News: 15 दिवसांपासून ऑनलाईन छळ
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी पीडित तरुणीला मागील पंधरा दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देत होता. वारंवार मेसेज, संपर्क करण्याचे प्रयत्न आणि त्रासदायक वर्तनामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. अखेर तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली.
Pune Crime News: कॅम्पसमध्येच जाब, वादाचे रूपांतर झटापटीत
संबंधित विद्यार्थी पुन्हा कॅम्पसमध्ये आल्याचे समजताच तरुणीचे वडील थेट महाविद्यालयात पोहोचले. त्यांनी त्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडत जाब विचारला. सुरुवातीला शब्दांत सुरू झालेला वाद काही क्षणांतच झटापटीत परिवर्तित झाला. संतप्त पित्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला; मात्र संतप्त पित्याला रोखण्याचे धाडस कुणी केले नाही. “मुलीला पुन्हा त्रास दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही पित्याने मुलीची छेड काढणाऱ्या मुलास दिला.
Pune Crime News: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवाव्यात
कॅम्पसमध्ये घडलेला हा प्रकार काही जणांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र ऑनलाईन छळाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक काटेकोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून व्यक्त होत आहे.
Pune Crime News: बँकॉक-पुणे विमानातून 75 लाखांचा गांजा जप्त
दरम्यान,बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात लपवून ठेवलेला सुमारे 75 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आला. या कारवाईत 745 ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत केला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या





















