(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha: बारावी ते पदवीधरांसाठी इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी; 'या' पदांसाठी करता येईल अर्ज
Job Majha: नोकरीच्या संधीत असलेल्या तरुणांना इंडियन ऑईलमध्ये अप्रेंटिस, प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बारावी ते पदवीधरांना ही संधी आहे.
Job Majha : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बारावी ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. विविध पदांच्या 1535 जागांसाठी अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे.
>> पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)
शैक्षणिक पात्रता - B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
एकूण जागा - 396
>> पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (फिटर)
शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, ITI (फिटर)
एकूण जागा - 161
>> पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर)
शैक्षणिक पात्रता : B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
एकूण जागा - 54
>> पोस्ट- टेक्निशियन अप्रेंटिस (केमिकल)
शैक्षणिक पात्रता - केमिकल / रिफायनरी आणि पेट्रो-केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा - 332
>> पोस्ट- टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा- 163
>> पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा - 198
>> पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (इन्स्ट्रुमेंटेशन)
शैक्षणिक पात्रता - इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा -74
>> पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (सेक्रेटेरियल असिस्टंट)
शैक्षणिक पात्रता - B.A./B.Sc/B.Com
एकूण जागा - 39
>> पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट)
शैक्षणिक पात्रता : B.Com
शैक्षणिक पात्रता - 45
>> पोस्ट- ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर- फ्रेशर)
शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण
शैक्षणिक पात्रता - 41
>> पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर- स्किल्ड)
शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण, ‘डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर’ मध्ये कौशल्य प्रमाणपत्र
एकूण जागा - 32
वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.iocl.com