Mandar Devastali : 'मन उडू उडू झालं'सह 'या' मालिकेचं दिग्दर्शन करणार लवगुरू मंदार देवस्थळी
Mandar Devastali : मंदार देवस्थळींनी आजवर अनेक लोकप्रिय मालिकांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Tu Tevha Tashi : लवकरच 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत मंदार देवस्थळींचे नाव घेतले जाते. त्यांनी अनेक सुपरहिट मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. मालिका विश्वातील लवगुरू अशी मंदार देवस्थळींची ओळख आहे. सध्या मंदार देवस्थळी दिग्दर्शन करत असलेली 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच ते 'तू तेव्हा तशी' या मालिकेचेदेखील दिग्दर्शन करणार आहेत.
'तू तेव्हा तशी' ही मालिका 20 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अव्यक्त प्रेमाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.
मंदार देवस्थळींच्या मालिकांमधील प्रेमकथांचा आशय नेहमीच रंजक असतो. त्यामुळे अव्यक्त प्रेमाची गोष्टदेखील ते त्यांच्या हटके स्टाईलमध्ये दाखवणार आहेत.
View this post on Instagram
'तू तेव्हा तशी' मालिकेबद्दल मंदार देवस्थळी म्हणाले,"आम्ही कायमच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट कदाचित प्रेक्षकांच्या भेटीला आली असेल. पण आम्ही आता ही गोष्ट नव्या पद्धतीने सांगणार आहोत. हेच 'तू तेव्हा तशी' या मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे."
मंदार देवस्थळींच्या गाजलेल्या मालिका
मंदार देवस्थळींनी अनेक मालिका गाजवल्या आहेत. 'वादळवाट', 'अवघाचि हा संसार', 'होणार सून मी या घरची', 'फुलपाखरू' या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. सध्या त्यांची 'मन उडू उडू झालं' ही मालिका सुरू आहे.
संबंधित बातम्या
Trending : 'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार'पासून 'ढिंच्याक पूजा'पर्यंत 'हे' कलाकार रातोरात झाले स्टार
Pawankhind : जय शिवराय! दुसऱ्या आठवड्यातही 'पावनखिंड' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई
Jhund : ...जेव्हा ‘महानायक’ प्रत्यक्ष भेटले! रिंकू-आकाशने शेअर केला ‘झुंड’चा अनुभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























